बांदा ता.२४-:* सातोसेत ट्रान्स्फॉर्मरमध्ये फ्युज घालत असताना भडका उडाल्याने वायरमन जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यात वायरमन श्री. सबकाळे यांच्या हातासह चेहर्यावर आगीचा लोळ उडाला.
स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. सातोसेतील ट्रान्स्फॉर्मर प्रमाणे मडुरे परबवाडी व माऊली मंदिर नजीकचा ट्रान्स्फॉर्मर धोकादायक स्थितीत आहेत. ट्रान्स्फॉर्मरचे दरवाजे तुटून पडल्याने उघड्या स्थितीत आहेत. याठिकाणी लहान मुले अथवा जनावरे गेल्यास गंभीर प्रसंग होण्याची शक्यता आहे.
ट्रान्स्फॉर्मरमधील केबलचे इन्सुलेशन खराब होऊन वायर ओपन झालेले आहेत. हँडलही जीर्ण झाल्याने वीजपुरवठा सुरु असतानाच फ्युज घालावा लागतो. त्यामुळे अशावेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत महाविरणच्या अधिकार्यांचे वारंवार लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे वायरमन जखमी झाल्याची घटना घडल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी दिली. मडूरेतील दोन्ही फ्यूज बॉक्स तातडीने बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
