राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर बाविसावा

सावंतवाडी ता.२४-:* कर्नाटकमधील मेंगलोर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीतील मुक्ताई अॅकेडमीचा राष्ट्रीय खेळाडु बाळकृष्ण पेडणेकर याने मुख्य गटात बाविसावा क्रमांक मिळवला.बाळकृष्णला रोख बक्षिस,ट्राॅफी आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. दक्षिण कर्नाटक बुदधिबळ असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय रॅपिड बुदधिबळ स्पर्धेत पंधरा राज्यातील तब्बल तीनशे अठरा खेळाडुंचा सहभाग होता.विशेष म्हणजे पारीतोषिकप्राप्त स्पर्धकांमध्ये बाळकृष्ण हा महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धक होता.

बाळकृष्ण सातत्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेणारा आणि पारीतोषिके मिळवणारा बाळकृष्ण हा जिल्ह्यातील एकमेव खेळाडु आहे.त्याच्यासोबत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुक्ताई अॅकेडमीच्या इतर विदयार्थ्यांचा सहभाग असतो.या विदयार्थ्यांना मुक्ताई अॅकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर आणि अॅकेडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन मिळते.

You cannot copy content of this page