तारकर्लीमध्ये एमटीडीसीच्या आवारात अद्ययावत प्राथमिक उपचार केंद्र उभारावे

चंद्रशेखर उपरकर यांची मागणी

कणकवली ता.२४-:* मालवणमधील तारकर्ली-देवबाग मध्ये पर्यटकांची वाढती गर्दी आणि समुद्रातील आकस्मिक घटनांवर पर्यटकाना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून तारकर्ली येथील एमटीडीसी च्या जागेमध्ये राज्य सरकारने अद्ययावत असे प्राथमिक उपचार केंद्र निर्माण क्ररावे अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन संस्था फेडेरशनचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यानी केली आहे.

तारकर्ली येथे नुकत्याच घडलेल्या स्कूबा डायव्हीगच्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरुन पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न किती महत्वाचा आहे याची प्रचिती येते. पर्यटन हंगामात तारकर्ली देवबाग येथे समुद्री पर्यटनाचा आनंद लुटणयासाठी येणाऱ्या पर्यटकाना अरुंद रस्त्यामुळे तारकर्लीतुन मालवण मध्ये येण्यासाठी अर्धा ते एक तासांचा कालावधी लागतो.

म्हणून पर्यटकांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी एमबीबीएस डॉक्टरांच्या पथकासह एक प्राथमिक उपचार केंद्र एमटीडीसी येथे उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच तेथे कार्डिएक ऑम्ब्युलन्सचीही व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. शिवाय पर्यटन हंगामात गर्दीच्या समुद्र किनारपट्टी परिसरात खास कॅमेरा द्वारे टेहळणी यंत्रणा आणि सुरक्षा रक्षक यांची निमणुक व्हावी. अन्यथा मालवणच्याच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी पर्यटन व्यावसायिका बरोबरच शासनानेही अत्याधुनिक व अत्यावश्यक सुविधा निर्माण करून घेतली पाहिजे.

You cannot copy content of this page