वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील
पाल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास अनंत गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाल विकास सोसायटी संचालक पदीही ते कार्यरत असून यावेळी पाल ग्रामपंचायत सरपंच कावेरी कमलेश गावडे यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी या सभेत, उपसरपंच प्रीती गावडे, ग्रामपंचायत अधिकारी अमर गाडेकर, सदस्य श्रीकांत गावडे, शामल केरकर, विनिता गावडे, कृष्णा गावडे, प्रदीप मुळीक, रोहन पालकर तसेच भाजपा पदाधिकारी तथा पाल सहकारी सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे, दिपक गावडे, राजाराम गावडे, नारायण गावडे, मुकुंद नाईक, योगेश कोनसुलकर, प्रभाकर गावडे, अंकुश गावडे, सुचिता नाईक, संपदा पिंगुळकर, पोलीसपाटील ऋतिका नाईक, राजश्री पालकर, अक्षता पालकर, गीतांजली गावडे, गौरी देऊलकर आदी उपस्थित होते.
पाल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विलास गावडे यांची बिनविरोध निवड
