पशु डॉक्टरला केले पाचारण;मोती तलावकाठी केले उपचार
सावंतवाडी ता.२४-:मोती तलावाकाठावर एक बैल जख्मी अवस्थेत असून, त्याला झालेल्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव होत असल्याने तो विव्हळत असल्याचे सामाजिक बांधिलकी च्या सदस्यांना निदर्शनास येताच सामाजिक बांधिलकी चे कार्यकर्ते रवी जाधव यांनी तातडीने पशू वैद्यकीय डॉक्टर वर्टी मॅडम व डॉक्टर चव्हाण सर यांना संपर्क करून त्यांना याबाबत माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच ७:३० च्या दरम्याने डॉक्टर घटनास्थळी दाखल होत. त्या बैलावर उपचार केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी एका गाडीची धडक बसून एक बैल गंभीर जख्मी झाला होता. त्याला झालेल्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव देखील होत होता. त्या बैलाला होत असलेल्या असह्य वेदनांमुळे तो सैरभैर झाला होता. ही बाब सामाजिक बांधिलकी च्या कार्यकर्त्यांना निदर्शनास येताच रवी जाधव यांनी पशू वैद्यकीय डॉक्टरांना संपर्क करून याची माहिती दिली. तसेच तुषार विचारे, निखिल सावंत, डिसिल्वा व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी शहरात मोकाट फिरणाऱ्या पाळीव जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांना योग्य ती समज देऊन ती जनावरे त्यांच्या ताब्यात द्यावीत आणि त्याबाबतचे आदेश काढावेत अशी मागणी सामाजिक बांधिलकी कडून करण्यात आली आहे.
