Headlines

एस एस आय कॉम्प्युटर येथे स्ट्रीट फूड वेंडोर प्रशिक्षण पूर्ण

प्रधानमंत्री कौशल्य विकास अंतर्गत जिल्हा कौशल्य विकासचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.२४-:* प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक सिंधुदुर्ग यांच्या वतीने किमान कौशल्य विकास जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण) मार्फत एस एस आय कॉम्प्युटर सावंतवाडी येथील स्ट्रीट फूड वेंडोर हा कोर्स यशस्वी रित्या पूर्ण करून स्वयंरोजगार सुरू केलेल्या यशस्वी विद्यार्थ्या मार्फत बनविण्यात आलेल्या बेकरी उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री उद्या दिनांक २५ मे रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १ यावेळेत एस एस आय कॉम्पुटर इन्स्टिट्यूट मध्ये आयोजित करण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. व्ही बी नाईक सर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एस एस आय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट चे सर्वेसर्वा श्री. तानावडे यांनी दिली आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्राला भेट देऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page