Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहिमेची तयारी…

वाहतूक कोंडीवर नगरपंचायतीचा कडक बडगा.. ⚡कणकवली ता.१०-: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कणकवली नगरपंचायतीने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसांत शहरात व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. शहरातील अप्पासाहेब…

Read Full News

माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी…

वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण.. ⚡मालवण ता.०९-:कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर,…

Read Full News

जोरदार वारा आणि पावसाचा आचरा गावाला तडाखा; पडझडीने लाखोंचे नुकसान…

⚡मालवण ता.०९-:आचरा परिसरात शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून घरांचे व दुकान गाळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काझीवाडी येथील इमारतीवरील मोबाईल टॉवर कोसळल्याने बीएसएनएलचे नेटवर्क गायब झाले आहे. गेले दोन दिवस आचरा परिसरात जोरदार वारे वाहून ढगाळ…

Read Full News

पडेल कॅन्टीन येथे १२ रोजी भव्य धम्म मेळावा…

माजी मंत्री भाई गिरकर यांची माहिती: डॉ. भीमराव आंबेडकर, नीतेश राणे राहणार उपस्थित.. ⚡देवगड ता.०९-:देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ, मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ, महिला सेवा संघ विजयदुर्ग विभाग व पंचशील महिला मंडळ (मुंबई व ग्रामीण) यांच्या संयुक्त विद्यमाने १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पडेल कॅन्टीन येथील साई गणेश मंगल कार्यालय येथे भव्य धम्म…

Read Full News

पावशी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

⚡कुडाळ ता.०९-: तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील ३० वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित अनिल पेडणेकर असे त्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार सत्यवान सखाराम मयेकर (रा. पावशी मिटक्याची वाडी) यांनी कुडाळ पोलिसात दिली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, संबंधित तरुणाचे वडील अनिल राजाराम पेडणेकर हे ४…

Read Full News

डॉ. रेड्डी खूनातील मुख्य आरोपीच्या पोलीस कोठडीसाठीचा रिव्हीजन अर्ज फेटाळला…

कणकवली : बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या हाय प्रोफाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इस्टेट एजंट व्यंकटेश बाबू याला पुन्हा पोलीस कोठडीत घेण्यासाठीचा कणकवली पोलिसांचा रिव्हीजन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळला आहे. कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला सुनावलेली न्यायालयीन कोठडी रद्द करून त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी, यासाठी…

Read Full News

आडेली आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ…

” गंभीर ” बाबीकडे निकषमय शासन लक्ष पूरविल काय ? ⚡वेंगुर्ला ता.०९-: पावसाळा तोंडावर आला असताना वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांना पाण्याचा मुबलक पुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील येथील पाणीपुरवठा करण्यासाठी आडेली ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेले विहिरीचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांवर “पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ” आली आहे….

Read Full News

सरंबळ दुर्गावाड घरावर विज कोसळून नुकसान…

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांची तातडीची मदत.. ⚡कुडाळ ता०९-: तालुक्यातील सरंबळ दुर्गावाड धनगरवाडी येथील रामा बापू वरक यांच्या राहत्या घरावर व माडावर विज कोसळून मोठे नुकसान झाले. त्यांच्या घराचे १०-१२ पत्रे फुटून गेले. तसेच उत्पन्न देणारे माडाचे झाड जळून नुकसान झाले. तसेच घरातील विद्युत फिटिंगचे सुद्धा नुकसान झाले आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर…

Read Full News

बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर करा…

मिलिंद सावंत:अवकाळी पावसाने बागायतदार संकटात; तत्काळ पंचनामा करून मदत द्या.. ⚡बांदा ता.०९-:सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी…

Read Full News

कणकवली तालुक्याला पावसाने झोडपले …

काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली, काही ठिकाणी घरांवर झाडे कोसळली,.. कणकवली : कणकवली शहरातील पटवर्धन चौकाजवळील मुख्य बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या महापुरुष देवस्थान येथील तब्बल दीडशे वर्षे जुन्या भल्या मोठ्या पिंपळ-वटवृक्षाची विशाल फांदी शनिवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र रस्त्यालगतच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

Read Full News

You cannot copy content of this page