Headlines

Global Maharashtra Breaking News

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे २८ रोजी ओरोस येथे आंदोलन

मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी ओरोस येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११. ३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालय गेटसमोर हे आंदोलन होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे. निवडणूक…

Read Full News

सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये…

*सिंधुदुर्ग जिल्ह्याला पालकमंत्री नितेश राणे यांच्या खंबीर नेतृत्वाची आली प्रचिती:शेतकऱ्यांना कर्जवसुलीपासून वीजबिलापर्यंत विविध सवलतींचा दिलासा.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-:पावसाची तूट आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला असून जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आठ तालुक्यांचा दुष्काळ व्यवस्थापनाच्या ‘Trigger-1’ अर्थात ‘पहिल्या कळ’मध्ये समावेश झाला आहे. राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट…

Read Full News

संजू परब यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन…

⚡कुडाळ ता. २६-: शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज कुडाळ येथील ‘सिंधुदुर्ग राजा’चे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा करून जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. दरम्यान, सिंधुदुर्ग राजा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने संजू परब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी…

Read Full News

‘सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत राजकारणातून पाणी पुरवठा घोटाळ्यात सभापतींचे नाव घेण्याची टीप’…

उबाठा शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांचा गौप्यस्फोट; दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी.. सावंतवाडी : नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांत दोन गट असून अंतर्गत राजकारणातून पाणी पुरवठा सभापतींचे नाव घेण्यासाठी टीप दिली गेली असा गौप्यस्फोट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी केला. तर समितीचा सदस्य म्हणून आम्ही हा घोटाळा होण्यापासून रोखल्याचे सांगत या घोटाळ्यास जबाबदार दोषींवर कारवाई व्हावी…

Read Full News

वेंगुर्ला पोलीस स्थानक येथे उद्या दशावतारी नाट्यप्रयोग

वेंगुर्लावेंगुर्ला पोलीस स्थानक येथे 17 दिवस सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त रविवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद व सायंकाळी 7 वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा“कुरुक्षेत्र” हामहान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. नागरिकांनी व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुला पोलीस स्थानक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

Read Full News

गोवा राखण यात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती…

पत्रादेवी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्या उपस्थितीत शुभारंभ.. ⚡बांदा ता.२६-: काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेत महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचीही प्रमुख उपस्थिती असून शनिवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्या उपस्थितीत पेडणे येथे गोवा राखण यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पेडणे येथील ग्रामदैवत भगवतीचा आशीर्वाद घेऊन तसेच पत्रादेवी येथील गोवा स्वातंत्र…

Read Full News

*जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित मुदतीत पूर्ण करा…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश.. ⚡सिंधुदुर्ग, दि. २६-: जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेली कामे विहित मुदतीत पूर्ण करून उपलब्ध निधीचा शंभर टक्के विनियोग होईल, यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. कोणताही निधी अखर्चित राहणार नाही, याची दक्षता घेत प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले….

Read Full News

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात …

‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवलीचे सुहास तायशेटे यांना प्रदान.. ⚡सावंतवाडी ता.२६-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठया उत्साहात झाला. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात यंदाचा ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवली येथील सुहास वसंत तायशेटे यांना…

Read Full News

बोलेरोच्या धडकेत रिक्षाचालक जखमी..

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.. ⚡सावंतवाडी ता.२६-: आजगाव-भोमवाडी येथील रिक्षाचालक विनायक रंगनाथ बाळे (वय ४२) हे प्रवाशाला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सोडून रिक्षाने आजगाव-भोमवाडी येथे परतत असताना बोलेरो वाहनाने त्यांच्या रिक्षाला समोरून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बाळे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मळेवाड-कोंडूरेचे उपसरपंच हेमंत मराठे, सागर नाईक व साहिल नाईक यांनी तातडीने घटनास्थळी…

Read Full News

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांत दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू…

पालकमंत्री नितेश राणे यांचे जिल्हा प्रशासनाला पंचनामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश:जिल्ह्यात जमीन महसूलात सूट, पीक कर्ज पुनर्गठनासह विविध सवलती.. ⚡सिंधुदुर्ग,दि.२६-: खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या सर्व आठही तालुक्यांमध्ये…

Read Full News

You cannot copy content of this page