Headlines

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मच्छीमार सेवा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡देवगड ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासह मच्छीमार सेवा योजना शिबिराला नागरिकांचा तसेच मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार अॅड. अजित गोगटे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खडपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे समाजोपयोगी कार्याला बळ मिळत असल्याचे सांगितले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित न राहता समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर मदत मिळावी, यासाठी अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
तसेच मच्छीमार बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मच्छीमार सेवा योजना शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ कसा घ्यावा, आवश्यक कागदपत्रे कोणती, तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपर्यंत मच्छीमारांना पोहोचविण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचा अनेक मच्छीमारांनी लाभ घेतला.
याप्रसंगी भाजपा देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, पंचायत समिती सभापती गणेश राणे, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, भाजप जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळस्कर, महिला तालुकाध्यक्षा केळुसकर, जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद पाटील, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर, नगरसेवक संतोष तारी, स्वच्छता सभापती बुवा तारी, सुभाष धुरी, बापू जुवाटकर, उल्हास मणचेकर, मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page