Global Maharashtra Breaking News

भिरवंडे खलांतर खरलवाडी येथे बिबट्याचे पुन्हा दर्शन

नागरिकांत भीतीचे वातावरण कणकवली 31 मार्च (प्रतिनिधी)-कणकवली तालुक्यातील भिरवंडे खलांतर खरलवाडी येथे सकाळी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्थानिकांनी वन विभागाकडे तक्रारी केल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. भिरवंडे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खरलवाडी येथे 23 मार्चला अनिल सावंत या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले…

Read More

पर्यटन विकासमंत्र्यांच्या दौऱ्यात सिंधुदुर्गला २३ कोटी १३ लाख

राजकीय संघर्षासाठी नाहीतर पर्यटन विकासासाठी आदित्य ठाकरे आले होते;पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती ओरोस ता.३१-:* पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा राजकीय संघर्षासाठी नव्हता तर पर्यटन विकासासाठी होता. या दौर्‍यात त्यांनी अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासच्या पर्यटन विकासासाठी २३ कोटी १३ लाख निधीची घोषणा केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी…

Read More

आरोंदा-बायपास-किरणपाणी रस्त्याचे भूमिपूजन

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत उपसरपंच सुभाष नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी ता.३१-: आरोंदा – बायपास – किरणपाणी या रस्त्याचे भूमिपूजन आज शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसरपंच सुभाष नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले या रस्त्यासाठी एक कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे . यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर…

Read More

बांद्यात शिमगोत्सव व रंगपंचमी उत्साहात साजरी

बांदा ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या बांदा शहरात पंधरा दिवसांचा शिमगोत्सव व रंगपंचमी बांदावासियांनी उत्साहात साजरी केली. कोरोनाचे संकट टळल्यानंतर बांदावासीयांनी रंग उधळत रंगमंचमी व शिमगोत्सव उत्साहात साजरा केला. होळी पौर्णिमेपासुन सुरु होणारा बांद्याचा शिमगोत्सवात गेले पंधरा दिवस विविध पारंपारिक विधींचे कार्यक्रम भक्तीमय वातावरणात सपन्न झाले.

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयात शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 एप्रिल रोजी होणार कार्यक्रम सावंतवाडी ता.३१-: भारतीय जनता पार्टी व कलानिकेतन सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर व कथकनृत्य पंडित बिरजू महाराज यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी पंचम खेमराज महाविद्यालयात शास्त्रीय नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रात…

Read More

रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित हे लोकप्रतिनिधीचे अपयश

परशुराम उपरकर यांचा टोला;केवळ ठेकेदारी मिळणाऱ्या विकासासाठी नेत्यांची धडपड कणकवली ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवेची दुरावस्था झाली आहे याला लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या योजनेसाठी निधी जाहीर करताहेत. हेच लोकप्रतिनिधी जनतेच्या गरजांकडे पाहत नाहीत.आरोग्य सेवा अत्यावश्यक आहे.मात्र,जिल्हा रुग्णालयात व कणकवली उपजिल्हा रुग्णालय व अन्य रुग्णालयातील वीज बिल थकीत असल्याने विजेचा पुरवठा बंद…

Read More

महागाई विरोधात मालवणात राष्ट्रीय काँग्रेसने छेडले आंदोलन

गॅस सिलेंडर व मोटरसायकलला घातला पुष्पहार मालवण ता.३१-:* पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध असो… गॅस दरवाढीचा निषेध असो… केंद्रातील भाजप सरकारचा निषेध असो… अशा घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार दिवसेंदिवस सातत्याने महागाई वाढ करून जनतेची लुट करत असल्याचा आरोप करत आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून महागाई मुक्त भारतसप्ताह आंदोलन…

Read More

केळूस विठ्ठल रखुमाई मंदिरात २ एप्रिलपासून श्रीरामनवमी महोत्सव

वेंगुर्ले ता.३१-: केळूस कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरांत प्रतिवर्षीप्रमाणे श्रीरामनवमी महोत्सव शनिवार दि. 2 एप्रिल ते रविवार दि. 10 एप्रिल कालावधीत भव्य बक्षिसांची सामाजिक नाटय़ स्पर्धा बरोबरच सांस्कृतीक, अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. त्यानिमीत्त 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता भजन, रात्रौ 9.30 वाजता सामाजिक नाटय़ स्पर्धेचे उदघाटन, रात्रौ 10 वाजता ओमकार…

Read More

सावंतवाडीतील परुळेकर नर्सिंग होममध्ये नव्या रूग्णसेवेचा शुभारंभ

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ उपस्थित राहण्याचे डॉ.जयेंद्र परुळेकर आणि डॉ.लीना परुळेकर यांचे आवाहन सावंतवाडी ता.३१-:* येथील आनंद पॉलीक्लिनिक आणि कै. डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम मध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन रुग्णसेवेचा शुभारंभ करण्यात येत असून, यामध्ये मेंदू विकार तज्ञ डॉ. मुकुंद अंबापूरकर, स्त्री रोग तज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. मृदुला महाबळ अंबापुरकर, कन्सल्टंट एंडोक्रोईनोलॉजिस्ट डॉ….

Read More

कुडाळ मालवणवासीयांना ना.आदित्य ठाकरे यांनी दिली विकास कामांची भेट

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत २३ कोटी १२ लाख रु.निधी मंजूर कणकवली ता.३१-: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. दरम्यान त्यांनी जिल्हा दौरा करत अनेक ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला. वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे आयोजित केलेला शिमगोत्सव व त्याला लाभलेला प्रतिसाद पाहून…

Read More
You cannot copy content of this page