Headlines

Global Maharashtra Breaking News

इंधन दरवाढ विरोधात रिक्षा संघटनेचे १ रोजी आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार धरणे ओरोस ता.२९-: सी .एन. जी. गॅस, पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या भरमसाठ दरवाढी विरोधात १ ऑगस्ट रोजी रिक्षा, टॅक्सी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज रवळनाथ मंदिर ओरोस येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. तशाप्रकरचे निवेदन जिल्हा प्रशासन व आरटीओ यांना संघटनेच्यावतीने देण्यात आले…

Read More

स्वच्छता अभियानात परुळेबाजार ग्रामपंचायतचे सातत्य

२०२१-२२ मिळविला प्रथम क्रमांकद्वितीय निरवडे तर तृतीय खांबाळे ग्रामपंचायत ओरोस ता.२९ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2021-22 अंतर्गत परुळेबाजार ग्रामपंचायतने जिल्हास्तरावर प्रथम तर निरवडे ग्रामपंचायतने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळें या दोन्ही ग्रामपंचायती विभागस्तरीय मूल्यमापनसाठी पात्र ठरल्या आहेत. तर तृतीय क्रमांक खांबाळे ग्रामपंचायतने मिळविला आहे. हा निकाल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शुक्रवारी जाहीर केला…

Read More

आस्था ग्रुपतर्फे समुह गीतगायना स्पर्धा

⚡मालवण ता.२९-: मालवण येथील आस्था ग्रुपच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे येथील प्राथमिक शाळेत होणार आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी आणि महाविद्यालयीन अशा दोन गटातील स्पर्धा होणार…

Read More

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे महिलांसाठी भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धा

सोन्याचा हार, नथ, चांदीची पैंजण, पैठणी, मोबाईल अशा बक्षिसांची खैरात ⚡मालवण ता.२९-: मालवणी संस्कृती व वारसा मंडळ या संस्थेतर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी भव्य दिव्य अशी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, यातील विजेत्या महिलांना पैठणी सोबत सोन्या, चांदीची बक्षिसे तसेच विशेष प्राविण्य म्हणून…

Read More

ईन्सुली शिवसेना उप विभाग प्रमुख पदी सचिन पालव यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२९-: ईन्सुली शिवसेना उप विभाग प्रमुख पदी सचिन पालव यांची निवड झाली आहे.शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, नाना पेडणेकर,  फ्रान्सिस रोड्रिक्स, विनायक सावंत, शब्बीर मणियार, तात्या  वेंगुर्लेकर, विनायक सावंत,  ठाकूर उपस्थित होते. ईनसुली विभागात शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणाऱ्र असल्याचे पालव यांनी…

Read More

निरवडे गावचे सुपुत्र प्रभाकर पावसकर यांच्या देणगीतून निरवडे-देऊळवाडी अंगणवाडी डिजिटल

⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: निरवडे देऊळवाडी येथील अंगणवाडी निरवडे गावचे सुपुत्र तथा भाभा अणू संशोधन केंद्रातील निवृत्त संशोधक प्रभाकर पावसकर यांनी शाळेसाठी दिलेल्या देणगी रक्कमेतून डिजिटल करण्यात आली आहे. या डिजिटल अंगणवाडीचे उदघाटन निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच चंद्रकांत गावडे, ग्रामसेवक मधुकर घाडी, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर, शिक्षण तज्ञ धर्माजी…

Read More

मळगाव येथील धर्मनाथ गोसावी व रेश्मा गोसावी यांना दाम्पत्य गौरव पुरस्कार प्रदान

रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात आला पुरस्कार ⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा दाम्पत्य गौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यातील ज्येष्ठ दाम्पत्य श्री धर्मनाथ शांताराम गोसावी व सौ. रेश्मा धर्मनाथ गोसावी या उभयतांना प्रदान करण्यात आला. गोसावी घराण्यात दीड दिवस नागपंचमी उत्सवाची परंपरा २०० वर्ष…

Read More

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. दिलीप शितोळे

कार्याध्यक्षपदी प्रा. संजय गावकर तर सचिव पदी प्रा. पवन वनवे यांची निवड ⚡सावंतवाडी ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या नवनियुक्त कार्यकारणीची सभा नुकतीच दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा येथे संपन्न झाली. या कार्यकारिणीच्या सभेमध्ये सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड झाली. अध्यक्ष – प्रा….

Read More

केंद्र संचालक असल्याच्या नावाखालीफसवणूक प्रकरणी खेड पोलिसांकडून दोघेजण ताब्यात

⚡कणकवली ता.२९-:कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आयुष्यमान भारत व नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात आक्षेप घेत मुद्दे उपस्थित केले. व या संदर्भात पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आता वाढत असल्याचे समोर येऊ लागले आहे. यात प्रामुख्याने काल कणकवलीत घटना घडल्यानंतर या प्रकरणातील संशयित असलेल्या दोघांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याची…

Read More

कठीण काळ शिवसेनेला संधी समजा व काम करा..

शिवसेना, युवासेनेच्या नेत्यांचे जिल्ह्यातील युवा सैनिकांना आवाहन ⚡कणकवली ता.२९-: शिवसेनेला जरी कठीण काळ असला तरी युवा सैनिकांनी पक्ष वाढीसाठी ही संधी समजा व काम करा. शिवसेना वाढीसाठी युवा सैनिकांनी स्वतः जबाबदारी घेऊन काम सुरू करा. आलेले संकट हे आव्हान समजून युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करा. असे…

Read More
You cannot copy content of this page