⚡मालवण ता.२९-: मालवण येथील आस्था ग्रुपच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा मालवण शहरातील रेवतळे येथील प्राथमिक शाळेत होणार आहे. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी आणि महाविद्यालयीन अशा दोन गटातील स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी आपली नावे सौगंधराज बादेकर मोबा नंबर 9420022890 यांच्याकडे द्यावित.
