रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात आला पुरस्कार
⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा दाम्पत्य गौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यातील ज्येष्ठ दाम्पत्य श्री धर्मनाथ शांताराम गोसावी व सौ. रेश्मा धर्मनाथ गोसावी या उभयतांना प्रदान करण्यात आला.
गोसावी घराण्यात दीड दिवस नागपंचमी उत्सवाची परंपरा २०० वर्ष चालू आहे. कै शांताराम बंडु गोसावी व त्यांचे भाऊ रामचंद्र बंडू गोसावी यांच्या नंतर ही परंपरा गेली २५ वर्षे धर्मनाथ गोसावी ही प्रथा आपल्या कुटुंबासोबत अत्यंत भक्तीपूर्ण करत आहेत. नागोबाची ५ फण्याची प्रतीमा दिड दिवस पूजताना प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा याचे कार्य करत आहेत. एकत्र कुटुंबात राह ताना या उत्सवाला साजरे करुन एकोपा जपत आहेत. तर सुमारे २२ वर्षांपूर्वी गोसावी परिवारात आगमन झाल्यावर आपल्या पती ब कुटुंबासोबत रेश्मा गोसावी या परपरेची जबाबदारी खंबीरपणे पार पाडत आहेत.
नागपंचमीच्या आदल्या दिवसापासून होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी पार पाडत असताना महिलांच्या भजना उपक्रमातही सक्रीय सहभागी होऊन आपल्या पती व कुटुंबियासोबत हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडत आहेत. यात गोसावी कुटुंबातील संजय शांताराम गोसावी, सतीश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी आदी कुटुंबीय सुद्धा भाग घेत असतात. पण घरातील ज्येष्ठ दाम्पत्य म्हणून या रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या या घरातील श्री धर्मनाथ गोसावी व सौ ल. रेश्मा गोसावी या दाम्पत्याला दाम्पत्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि प्रत्येकी २,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराची सर्व रक्कम नागपंचमी सणासाठीच खर्च करणार असल्याचे, धर्मनाथ गोसावी यांनी सांगितले.
