⚡सावंतवाडी ता.२९सहदेव राऊळ-: निरवडे देऊळवाडी येथील अंगणवाडी निरवडे गावचे सुपुत्र तथा भाभा अणू संशोधन केंद्रातील निवृत्त संशोधक प्रभाकर पावसकर यांनी शाळेसाठी दिलेल्या देणगी रक्कमेतून डिजिटल करण्यात आली आहे.
या डिजिटल अंगणवाडीचे उदघाटन निरवडे गावचे सरपंच हरी वारंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच चंद्रकांत गावडे, ग्रामसेवक मधुकर घाडी, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पेडणेकर, शिक्षण तज्ञ धर्माजी गावडे, निवृत्त शिक्षक वासुदेव गावडे, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक, अंगणवाडी सेविका आळवे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मराठी माद्यमाच्या शाळा व अंगणवाड्या टिकून राहाव्यात, त्यांची गुणवत्ता वाढावी, त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी व निरवडे मधील बाल विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना संगणकीय ज्ञान मिळावे याचा विचार करुन प्रभाकर पावसकर यांनी ही देणगी शाळेला दिली आहे.
.
