कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. दिलीप शितोळे

कार्याध्यक्षपदी प्रा. संजय गावकर तर सचिव पदी प्रा. पवन वनवे यांची निवड

⚡सावंतवाडी ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या नवनियुक्त कार्यकारणीची सभा नुकतीच दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा येथे संपन्न झाली. या कार्यकारिणीच्या सभेमध्ये सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड झाली.


अध्यक्ष – प्रा. दिलीप शितोळे (बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले),
कार्याध्यक्ष – प्रा. संजय गावकर (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा),
सचिव – प्रा. पवन वनवे (आरपीडी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी),
उपाध्यक्ष – प्रा. अरुण चव्हाण (कणकवली कॉलेज, कणकवली), प्रा. प्रकाश किल्लेदार ( जुनिअर कॉलेज, कुडासे), प्रा. नामदेव मासी (ज्युनिअर कॉलेज कट्टा ),
खजिनदार – प्रा. विनोद चिंदरकर (कनिष्ठ महाविद्यालय, देवगड),
सहसचिव – प्रा. काशिनाथ बागेवाडी (जुनिअर कॉलेज, साळगाव),
समन्वयक – प्रा. कांतीलाल जाधवर ( कणकवली कॉलेज,कणकवली),
सल्लागार – प्रा. गंगाधर काळे (जुनिअर कॉलेज, बांदा)
संघटनेच्या कार्यकारिणीच्या सभेला वरील पदाधिकारी तसेच कार्यकारिणीचे सदस्य प्रा. डॉ. श्रीराम दीक्षित (शिरोडा), प्रा. नारायण साळवी (कुडाळ), प्रा. रामचंद्र राऊळ (कासार्डे), प्रा. अनिल मांगले (दोडामार्ग), प्रा. अमोल कांबळे (सावंतवाडी), प्रा. कृष्णा गुरसाळे (खारेपाटण) आदी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रियेदरम्यान हंगामी अध्यक्ष म्हणून संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. कांतीलाल जाधवर यांनी काम पाहिले व त्यांनी नवनियुक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे अभिनंदन केले, व संघटनेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी पदाधिकार्‍यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील सभासदांच्या २०२० – २०२१ या वर्षातील पी.एफ. स्लीप, ३ वर्षापासून प्रलंबित थकित वेतन प्रस्ताव, २ वर्षाच्या डीसीपीएस स्लीप तसेच जुनी पेन्शन योजना तसेच विनाअनुदानित घोषित कनिष्ठ महाविद्यालयाचे अनुदान या व इतर विषयावर चर्चा झाली. माध्यमिक शिक्षणाधिकारी ,सिंधुदुर्ग यांना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन द्यावयाचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सभासद वाढविण्यासाठी जिल्हाभर कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन अभियान राबवायचे सर्वानुमते ठरविण्यात आले
दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. दिलीप शितोळे, कार्याध्यक्ष प्रा. संजय गावकर व सचिव- प्रा. पवन वनवे यांनी निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व प्रा. काळे यांनी सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले.

You cannot copy content of this page