Global Maharashtra Breaking News

मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची ७ रोजी सभा…

⚡मालवण ता.०५-:मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे होणार आहे. तरी सर्व सदस्यांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघांचे अध्यक्ष अजित गवंडे व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्यात ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ गड मोहीम संपन्न…

⚡मालवण ता.०५-:मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ ही गड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्याची स्वच्छता, श्री भवानी देवीचा नामजप, गड भ्रमंती, स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून बलोपासना करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्यामधील श्री शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री भवानी माता यांच्या चरणी पुष्पहार आणि…

Read More

मालवणात मद्यमुक्तीबाबत जानेवारीत तीन दिवसीय आरोग्य शिबीर…

⚡मालवण ता.०५-:अति दारु पिणाऱ्या व्यक्तींना दारु पिण्याच्या सवयीपासुन परावृत्त करून समाजात चांगले जीवन जगण्याचा मार्ग दाखविणाऱ्या व गेली २५ वर्षे मालवण मध्ये विनामुल्य कार्य करणाऱ्या अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (अनामिक मद्यपी संघटना) मालवण या संस्थेचा २५ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त शासकिय ग्रामिण रुग्णालय मालवण येथे ३ दिवसीय मोफत आरोग्य शिबिर (डिटॉक्स कॅम्प) दि. ७,…

Read More

निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक, मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत…

रवींद्र चव्हाण:राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच सरकार गतीमान पद्धतीने काम करतय.. ⚡सावंतवाडी ता.०५-: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे चालावं अशी धारणा आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीतील नेत्यांशी चर्चा झाली. घडलेल्या…

Read More

माकडांच्या उपद्रवाबाबत ठाकरे सेनेने घेतली वन विभागाची भेट…

वनविभागाकडून सकारात्मक प्रतिसाद.. कुडाळ : शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज वनविभागाची भेट घेण्यात आली. यावेळी कुडाळ शहरांत माकडांमुळे भात शेती, केळी नारळांचे होणारे नुकसान यासंदर्भात कुडाळ वन क्षेत्रपाल सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. माकडांचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.माकडापासून होणाऱ्या त्रासाबाबत आवाज कुडाळ…

Read More

वेतन कमी केल्यावरून महावितरणचे कंत्राटी कामगार एकवटले…

कामाचे तास, अधिकाऱ्यांची मनमानी याबाबत कंत्रादारांकडे वाचला पाढा:आठ दिवसात निर्णय देण्याची कंत्राटदारांची ग्वाही.. ⚡कुडाळ ता.०४-: महावितरणचे बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांचे वेतन कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कोणतीही संघटना किंवा राजकीय सहकार्य न घेता या अन्यायाविरोधात न्याय मागण्यासाठी हे कंत्राटी कामगार एकत्र आले आहेत. याबाबत कुडाळ विभागातील कंत्राटी कामगार आणि कंत्राटदार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आज कामगार…

Read More

तळवडे येथे ‘स्वामी लॅबोरेटरी’चे भव्य उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०४-: तळवडे गेट, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे डॉ. सावंत दवाखान्याजवळ सुरू करण्यात आलेल्या ‘स्वामी लॅबोरेटरी’चे गुरुवार, दि. ०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. या नवीन रक्त व लघवी तपासणी प्रयोगशाळेमुळे तळवडे आणि परिसरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. या उद्घाटन सोहळ्याला तळवडे ग्रामपंचायतीच्या…

Read More

सूनबाई तोऱ्यात’ला सिंधुदुर्ग केंद्रातील प्रथम पारितोषिक…

⚡मालवण ता.०४-: मालवण आणि वेंगुर्ला येथे झालेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या सूनबाई तोऱ्यात या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या वाट चुकलो देव या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी आज एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे…

Read More

व्ही.एन. नाबर स्कूलमध्ये आरोग्य-जागृती सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.०४: व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, बांदा येथे सावंतवाडी येथील डॉ. मिनल सावंत यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन सत्र घेऊन विद्यार्थ्यांना आरोग्य आणि स्वच्छतेची महत्त्वपूर्ण माहिती दिली.शाळेतील एम.एस.ए.टी. विषयाअंतर्गत आरोग्य, स्वच्छता व अन्न तंत्रज्ञान या विषयांचे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना अधिक सखोल मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने एम.एस.ए.टी….

Read More

भोसले नॉलेज सिटीतर्फे JEE-NEET मार्गदर्शन सत्र; पालक व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…

⚡सावंतवाडी ता.०४-: इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी भोसले नॉलेज सिटीच्या वतीने शनिवार, 6 डिसेंबर 2025 रोजी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सत्रामध्ये JEE व NEET परीक्षेची माहिती, तयारीची रणनीती, अभ्यास पद्धती, भविष्यातील प्रवेश प्रक्रिया याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे._ हे सत्र सर्व पालक व…

Read More
You cannot copy content of this page