Headlines

Global Maharashtra Breaking News

पाऊस, वाऱ्याने मालवणला झोडपले

मेढा येथे झाड पडून वीज वाहिन्या तुटल्या ⚡मालवण ता.०७-: जोरदार पाऊस व वाऱ्याने मालवणला झोडपून काढले असून मालवणात मालवण शहरातील मेढा येथे बंदर जेटी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या प्रियेश लुगेरा यांच्या जागेतील गुलमोहरचे मोठे झाड आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यामुळे कोसळून मुख्य रस्त्यावर पडले. यामुळे वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा खंडित…

Read More

नारळ लढविणे स्पर्धेत महेश शिरपुटे विजयी

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील दत्त मंदिर भरड मित्रमंडळ यांच्या वतीने दत्त मंदिर भरड येथे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित नारळ लढविणे स्पर्धेत महेश शिरपुटे यांनी विजय मिळवला. तर आनंद आचरेकर उपविजेते ठरले. महेश शिरपुटे यांना रु. ५,५५५ व चषक तर आनंद आचरेकर यांना रु. ३३३३ व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला….

Read More

बावशी येथील पावसामुळे कोसळल्या घराची आम.नितेश राणेंनी केली पाहणी

⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील बावशी येथील सत्यवान मर्ये यांचे राहते घर पावसामुळे कोसळून नुकसान झाले होते.त्यामुळे रविवारी आम. नितेश राणे यांनी या कोसळलेल्या घराची पाहणी केली. त्यांच्यासोबत तहसीलदार आर. जे. पवार उपस्थित होते,त्यांना कोसळलेल्या घरासंदर्भात तातडीने अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवा नुकसानग्रस्त मर्ये कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याच्या सूचना आ. राणे यांनी दिल्या. यावेळी माजी सभापती मनोज रावराणे,…

Read More

मेडिकल दुकानातील चोरी प्रकरणी अटकेतील सातही संशयितांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.०७-: कुडाळ येथील एका मेडिकल तसेच एका दुकानात चोरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ७ ही संशयित आरोपींना, काल कुडाळ न्यायालयाने अटी व शर्ती घालून प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपींच्या वतीने अँड राहुल मडगावकर आणि अँड धीरज सावंत यांनी काम पाहिले आहे.

Read More

बांदा उपसरपंच हर्षद कामत यांची माजी खासदार निलेश राणे साहेब यांनी घेतली भेट

तब्येतिची विचारपूस करत कृत्रिम पाय लावून देण्याची घेतली जबाबदारी ⚡बांदा ता.०७-: : अपघातात पाय गमावल्यामुळे जायबंदी झालेले बांदा उपसरपंच हर्षद कामत यांची माजी खासदार निलेश राणे यांनी भेट घेत तब्येतिची विचारपूस केली. उपसरपंच कामत यांना जगातील चांगल्यात चांगले कृत्रिम पाय लावून देऊन पुन्हा जनसेवा करण्यासाठी आपल्या स्वतःच्या पायावर उभ करण्याची जबाबदारी आता आपली आहे, असे…

Read More

महागाई विरोधी लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाच्या विविध घडामोडी

आ वैभव नाईक यांचा आरोप ⚡देवगड ता.०७-: देशात महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. पेट्रोल डिझेल गॅस खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.मात्र या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या घडामोडी देशात घडविल्या जात आहेत.महागाई बेरोजगारी या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा भाजपचा डाव आहे….

Read More

१५ ऑगस्टला तुळस, होडावडा, मतोंडचे बागायतदार करणार उपोषण

नुकसानी मिळाली नसल्याने घेतला निर्णय वेंगुर्ला प्रतिनिधी- पिक विमा २०२१-२२ मधील नुकसान भरपाई तात्काळ जमा करण्याबाबत वारंवार निवेदन देऊनही नुकसान भरपाई न मिळाल्याने तुळस, होडावडा व मातोंड गावातील आंबा व काजू बागायतदार शेतक-यांनी १५ ऑगस्ट रोजी वेंगुर्ला तालुका कृषी कार्यालासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून तशा आशयाचे लेखी निवेदन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले…

Read More

पर्यावरणासाठी वृक्ष लागवड महत्वाची

चंद्रहार जगदाळे यांचे प्रतिपादन;निमुजगा येथे लागवड उपक्रम वेंगुर्ला प्रतिनिधी- पर्यावरणाच्या दृष्टिकोनातुन जास्तीत जास्त जमिनीमध्ये वृक्ष लागवड अपेक्षित असून वन अधिकारी सुभाष पुराणीक यांच्या मार्गदर्शना खाली शहर व ग्रामीण भागात आपली यशस्वी घोडदौड चालू असल्याचे प्रतिपादन चंद्रहार जगदाळे यांनी निमुजगा येथे वृक्षारोपण प्रसंगी केले.

Read More

जिल्हा काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी अजिंक्य गावडे यांची नियुक्ती…

प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र सावंतवाडी ता.०७-:जिल्हा काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी श्री अजिंक्य गावडे यांची नियुक्ती प्रदेश काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र त्यांना आज प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

Read More

सी. ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संकेत गावडे यांचा मनसेकडून सत्कार…

सुरेंद्र कोठावळे आणि आशिष सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार… ⚡सावंतवाडी ता.०६-: इन्सुली गावातील संकेत गावडे या युवकाने मेहनतीने सी.ए परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे, त्यानी मिळविलेले हे यश तालुक्यासाठी भूषणावह असल्याने मनसेचे इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे व सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून श्री गावडे यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व…

Read More
You cannot copy content of this page