पर्यावरणासाठी वृक्ष लागवड महत्वाची

चंद्रहार जगदाळे यांचे प्रतिपादन;निमुजगा येथे लागवड उपक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी- पर्यावरणाच्या दृष्टिकोनातुन जास्तीत जास्त जमिनीमध्ये वृक्ष लागवड अपेक्षित असून वन अधिकारी सुभाष पुराणीक यांच्या मार्गदर्शना खाली शहर व ग्रामीण भागात आपली यशस्वी घोडदौड चालू असल्याचे प्रतिपादन चंद्रहार जगदाळे यांनी निमुजगा येथे वृक्षारोपण प्रसंगी केले.

  वनक्षेत्रपाल सामाजिक वनिकरण वेंगुर्ला यांनी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वेंगुर्ला, लोकनेते अॅड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, वेंगुर्ला व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रा. डॉ. संजीव लिंगवत, वनपाल सुरज वसंत बागुल, वनमजुर बा.ल.डोईफोडे, सामाजिक वनिकरण वेंगुर्लाचे कर्मचारी व होमिओपॅथीक कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
You cannot copy content of this page