वेंगुर्ला
वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा आज बुधवार 9 सप्टेंबर रोजी सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली पं. स. सभागृहात संपन्न झाली. यावेळी श्री गणेश चतुर्थी सण अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून प्रवाशांच्या व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने एसटी महामंडळाने योग्य नियोजन करावे. श्री गणेश चतुर्थी कालावधीत वीज पुरवठा खंडित न करता सुरळीत ठेवण्यात यावा. वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत. तसेच तालुक्यातील रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी कटिंग करण्यात यावी, आदी सूचना सभापती शंकर घारे यांनी आज बुधवारी झालेल्या पंचायत समिती मासिक सभेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर,आसोली पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, म्हापण पं. स. सदस्य विष्णू फणसेकर, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर,तुळस पं. स. सदस्य सुचिता वजराटकर, वायंगणी पं. स. सदस्य शीतल बांदवलकर -राऊत , उभादांडा पं. स. सदस्य साक्षी नार्वेकर,रेडी पं. स. सदस्य प्रियांका घाटवळ, शिरोड पं. स. सदस्य योगिता परब तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध ठराव घेण्यात आले.
श्री गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने योग्य नियोजन करा : श्री. शंकर घारे
