Headlines

गांडूळ खत निर्मिती प्रकल्पांना कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन द्या : दादा साईल…

सिंधुदुर्गनगरी ता ९
नारळ जिल्ह्यात गांडूळ खत निर्मिती प्रकल्प काही बचत गट व शेतकऱ्यांनी उभारले आहेत मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे तरी अशा शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक मार्फत योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. अशी सूचना सभापती दादा साईल यांनी सभेत केली .

जिल्हा परिषद कृषी समितीची सभा सभापती दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी दीक्षांत कोळप समिती सदस्य विक्रांत सावंत विजय नाईक सुयोगी घाडी सुजाता पडवळ आदींसह खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते

आजच्या सभेत गांडूळ खत निर्मिती प्रकल्प काही बचत गटांनी उभारले आहेत तसेच काही शेतकऱ्यांनीही गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तयार केले आहेत मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांना आवश्यक उत्पन्न मिळत नसल्याची बाब सदस्य सुजाता पडवळ यांनी सभेत उपस्थित केली यावेळी जिल्ह्यात गांडूळ खत निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी त्यासाठी जास्तीत जास्त बचत गट पुढे यावेत यासाठी गांडूळ खत निर्मिती करणाऱ्या बचत गट आणि शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांमार्फत योग्य मार्गदर्शन देण्यात यावे अशी सूचना यावेळी सभापती दादा साइल यांनी केली.

सामाजिक वनीकरण व बांधकाम विभागामार्फत रस्त्यालगत वृक्ष लागवड करण्यात आली आहे ही वृक्ष लागवड कोणत्या योजनेतून करण्यात आली व त्याच्या संगोपनाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला मात्र संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने याबाबत माहिती मिळू शकली नाही मात्र पुढील सभेत याचा अहवाल मागवून घ्यावा तसेच रस्त्यालगत लावण्यात येणारी झाडे स्थानिक फळझाडे असावीत जेणेकरून येथील नागरिकांना त्याचा उपयोग होईल अशी सूचना यावेळी सदस्यांनी केली

आजच्या सभेत हत्ती गवे अशा वन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणात बागायतींचे व शेतीचे नुकसान होत आहे यावर वेळीच उपायोजना व्हाव्यात तसेच नारळ सुपारी फळांवर बुरशी कोळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे यामुळे शेतकरी बगायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जले आहे . याबाबत गावागावात मार्गदर्शन मेळावे आयोजित करून याबाबत उपाय योजनेचे नियोजन करावे अशा सूचना सभापती दादा साईल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

You cannot copy content of this page