Headlines

वीज व स्ट्रीट लाईट समस्या तातडीने दूर करा

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व नगरसेविका अश्विनी कांदळकर यांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष

मालवण (प्रतिनिधी)

मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व महिला बालकल्याण उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर यांनी मालवण वीज वितरण कार्यालयात वीज अभियंता सचिन म्हेत्रे यांची भेट घेऊन वीज समस्यांबाबत लक्ष वेधले. मालवण शहरातील वीज तसेच स्ट्रीट लाईटच्या ज्या ज्या तक्रारी आहेत, समस्या आहेत त्या तातडीने दूर करा, असे यावेळी श्री. बापर्डेकर यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक बापार्डेकर व सौ. कांदळकर यांच्या समवेत अनिल कांदळकर उपस्थित होते. मेढा कुंभारगल्ली कोतेवाडा परिसरातील स्ट्रीट लाईटची समस्या दूर करण्यासाठी फेज टाकून देण्याचीही मागणी नगरपरिषद स्तरावरून करण्यात आली आहे. या कामाबाबतची पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. यांसह परिसरातील अन्य वीज समस्या प्राध्यानाने सोडवाव्यात. वीज खांब तसेच वीज वाहिनी यावर मोठया प्रमाणात झाडी वेली वाढल्या आहेत. त्यामुळे विज समस्या निर्माण होत आहेत. त्याबाबतही तातडीने कार्यवाही व्हावी असेही श्री. बापर्डेकर व कांदळकर यांनी वीज अधिकाऱ्यांना सांगितले.

वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी, स्ट्रीट लाईटच्या समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य वीजविषयक प्रश्नांबाबतही यावेळी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेषतः रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट सुरळीत असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

नागरिकांना तत्पर सेवा मिळाली पाहिजे यां दृष्टीने त्वरित कार्यवाही झाली पाहिजे. आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असेही सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले. वीज वितरण विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे वीज अभियंता श्री. म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page