नारळ लढविणे स्पर्धेत महेश शिरपुटे विजयी

⚡मालवण ता.०७-: मालवण येथील दत्त मंदिर भरड मित्रमंडळ यांच्या वतीने दत्त मंदिर भरड येथे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित नारळ लढविणे स्पर्धेत महेश शिरपुटे यांनी विजय मिळवला. तर आनंद आचरेकर उपविजेते ठरले. महेश शिरपुटे यांना रु. ५,५५५ व चषक तर आनंद आचरेकर यांना रु. ३३३३ व चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. दत्त मंदिरचे पुजारी बाळू काजरेकर, उमेश मांजरेकर, ग्लोबल रक्तदाताचे ग्रुपचे संघटक विजय पांचाळ, सचिन गिरकर, प्रकाश करंगुटकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी करण खडपे, मंदार ओरसकर, शैलेश मालंडकर, अमेय देसाई, स्वप्नील गवंडी, दत्तप्रसाद वेर्लेकर, गौरव वेर्लेकर, जयंत शिरपुटे, अण्णा माणगावकर, अंश वाळके, स्पर्श वाळके, विकी माळगावकर, भूषण गवंडी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page