बावशी येथील पावसामुळे कोसळल्या घराची आम.नितेश राणेंनी केली पाहणी

⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यातील बावशी येथील सत्यवान मर्ये यांचे राहते घर पावसामुळे कोसळून नुकसान झाले होते.त्यामुळे रविवारी आम. नितेश राणे यांनी या कोसळलेल्या घराची पाहणी केली. त्यांच्यासोबत तहसीलदार आर. जे. पवार उपस्थित होते,त्यांना कोसळलेल्या घरासंदर्भात तातडीने अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवा नुकसानग्रस्त मर्ये कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याच्या सूचना आ. राणे यांनी दिल्या.

यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, भाजपा सरचिटणीस, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके ,सरपंच मनाली गुरव,उपसरपंच अशोक बोभाटे, विलास कांडर,ग्रामपंचायत सदस्य सानिका गावडे,रवींद्र बोभाटे,बाळा बोभाटे,मंडल अधिकारी श्रीमती जाधव,तलाठी श्री.अलकुटे,ग्रामसेवक श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page