बांदा उपसरपंच हर्षद कामत यांची माजी खासदार निलेश राणे साहेब यांनी घेतली भेट

तब्येतिची विचारपूस करत कृत्रिम पाय लावून देण्याची घेतली जबाबदारी

⚡बांदा ता.०७-: : अपघातात पाय गमावल्यामुळे जायबंदी झालेले बांदा उपसरपंच हर्षद कामत यांची माजी खासदार निलेश राणे यांनी भेट घेत तब्येतिची विचारपूस केली. उपसरपंच कामत यांना जगातील चांगल्यात चांगले कृत्रिम पाय लावून देऊन पुन्हा जनसेवा करण्यासाठी आपल्या स्वतःच्या पायावर उभ करण्याची जबाबदारी आता आपली आहे, असे निलेश राणे यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, माजी सभापती प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदयस जावेद खतिब, ग्रामपंचायत सदयस बाळू सावंत . संदीप बांदेकर संतोष नानचे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, गुरु सावंत नयनेश्वर सावंत , साई धारगळकर , स्वप्नील सावंत , सागर सावंत प्रवीण देसाई मधू देसाई समीर सावंत निलू देसाई सिद्धेश महाजन आदी उपस्थित होते.

उपसरपंच हर्षद कामत यांचा महिन्याभरपूर्वी महामार्गावर नांदगाव येथे अपघात झाला होता. त्याच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्यांचा जायबंदी झालेला पाय काढण्यात आला होता. भाजपचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी कामत कुटुंबियांना धीर देत भाजप तुमच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचा विश्वास दिला. जगातील सर्वात महागडा पाय आपण स्वतः खर्च करून बसवून देण्याची ग्वाही दिली. तसेच पुढील वैद्यकीय उपचारांची जबाबदारी स्वीकारताना आपण निश्चिन्त राहावे असे सांगितले. येत्या २ महिन्यात याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगत प्रमोद कामत व अक्रम खान यांनी यासंदर्भातील सविस्तर वैद्यकीय उपचारांची माहिती देण्याची सूचना केली.


श्री राणे म्हणाले कि, हर्षद हे भाजपचे क्रियाशील उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. अत्याधुनिक पाय बसविण्यात आल्यानंतर आपण येत्या २ महिन्यात पुन्हा जनतेत येऊन समाजकार्य करण्यासाठी सज्ज व्हाल.

You cannot copy content of this page