सी. ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संकेत गावडे यांचा मनसेकडून सत्कार…

सुरेंद्र कोठावळे आणि आशिष सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०६-: इन्सुली गावातील संकेत गावडे या युवकाने मेहनतीने सी.ए परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे, त्यानी मिळविलेले हे यश तालुक्यासाठी भूषणावह असल्याने मनसेचे इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे व सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून श्री गावडे यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक उपशहरअध्यक्ष शुभम सावंत सचिव कौस्तुभ नाईक मुकुंद धारगळकर आकाश परब धनेश नाईक साहिल कोठावळे जयेश कोठावळे स्वप्निल कोठावळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page