गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी घेतली नियोजन बैठक
देवगड (प्रतिनिधी)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देवगड किल्ला येथे स्वराज्य महोत्सव साजरा होणार असून या बाबत नियोजनासाठी पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी श्री .अरूण चव्हाण यांनी ऐतिहासिक स्थळ देवगड किल्ला येथे भेट देत अधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या . यावेळी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , विस्तार अधिकारी( ग्रा.प ). निलेश जगताप , विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) अंकुश जंगले , शिक्षक सचिन जाधव आदी उपस्थित होते .
९ ऑगस्ट २०२२ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता पदयात्रा मोटारसायकल फेरी तहसील कार्यालय ते देवगड किल्ला पदयात्रेचे आयोजन , देवगड किल्ला येथे १०.२० ते १०.४० नागरिकांना भारताच्या नकाशा प्रतिकृती मध्ये तिरंग्यातील तीन रंगाप्रमाणे उभे करणे ( सुमारे ५०० नागरीक ) ठीक ११वाजता देवगड किल्ला येथे राष्ट्रगीताचे समुह गायन सर्व नागरीक आणि सकाळी ११.५ ते ११ .३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये शेठ म. ग. हायस्कुल देवगड देश भक्ती गीत , इग्लीश मिडीयम स्कुल देवगड देश भक्तीपर गीत , देवगड कॉलेज ग्रुप डान्स , आर्ट सर्कल देवगड देश भक्ती पर गीत , सौ . मनस्वी घारे देश भक्तीपर गीत , तसेच ११ .३५ वाजता स्वातंत्र सैनिकांचे स्मरण , ११ .४५ वाजता तीन रंगातील फुगे हवेत सोडणे ,११ .५० वाजता अल्पोपहार व समारोप व १२ वाजता चित्ररथाचे मान्यवरांचे हस्ते उदघाटन अशा प्रकारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
देवगड मधील सर्व घटक पहिल्यांदाच या उपक्रमाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत
या उपक्रमांत तहसील कार्यालय देवगड,पंचायत समिती देवगड चे सर्व विभाग ,देवगड जामसंडे नगरपंचायत,पोलीस स्टेशन देवगड, सन्माननीय लोकप्रतिनिधी ,सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये सर्व विविध संस्था तेथील सर्व कर्मचारी, बार कौन्सिल देवगड ,देवगड जामसंडे नगर पंचायत क्षेत्रातील व जवळच्या क्षेत्रातील सर्व प्राथ./माध्य./उच्च माध्यमिक विद्यालये,कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय ,तेथील विध्यार्थी एन सी सी ,एन एस एस युनिट , होमगार्ड, व्यापारी मंडळे/शहर विकास मंडळ/ग्रामस्थ मंडळ/क्रीडा मंडळे/महिला मंडळे/सांस्कृतिक मंडळे /बचत गट ,रोटरी क्लब,पत्रकार संघ, डॉक्टर्स असोसिएशन ,इंजिनिअर्स असोसिएशन, सहभागी होणार आहेत.
या उपक्रमात देवगड तालुक्यातील नागरिकांनी पुरुषांनी सफेद शर्ट किंवा टीशर्ट व पॅन्ट तसेच महिलांनी केशरी किंवा हिरव्या साडया किंवा ड्रेस असल्यास हिरव्या ओडणी किंवा केशरी ओडणी परीधान करून यावात तसेच सर्व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी. अरूण चव्हाण यांनी केले आहे.
