देवगड पोलीस ठाण्याच्यावतीने रोजी मॅरेथॉन

मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी केला शुभारंभ

⚡देवगड ता.०७-: ‘हर घर झेंडा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत देवगड पोलीस स्थानकाचे वतीने ७ ऑगस्ट रोजी देवगड तालुका मर्यादित मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा शुभारंभ श्रीफळ फोडून मुख्याध्यापक संजीव राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण,सर्व पोलीस कर्मचारी विद्यार्थी नागरिक उपस्थित होते .ही स्पर्धा १४ वर्षावरील पुरुष व महिला अशा दोन गटात पार पडली,.

देवगड मांजरेकर नाका ते जामसंडे या अंतरावर ही स्पर्धा पार पडली यात पुरुषांसाठी ५ कि. मी. तर महिलांसाठी २.५ कि. मी. अंतर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page