Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली शहरात नालेसफाई मोहिमेला वेग…

४० पेक्षा अधिक गटारे आणि नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू.. ⚡कणकवली ता.१९-: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग आला आहे. पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणे, दुर्गंधी पसरणे आणि डासांचे प्रमाण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली असून, शहरातील ४० पेक्षा अधिक गटारे तसेच मोठ्या नाल्यांची साफसफाई सध्या युद्धपातळीवर…

Read Full News

सकल हिंदू संमेलन समन्वय समिती तर्फे सिंधु मित्र आनंद मेस्त्री व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१९-: सकल हिंदू संमेलन समन्वय समिती तर्फे सामाजिक क्षेत्रामध्ये अविरत निस्वार्थपणे कार्य करणारे सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे आनंद मिस्त्री यांचा सत्कार शिवचरित्रकार व अध्यक्ष हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्याचे डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचा सत्कार कीर्तनकार ह.भ.प.श्री विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी महाराज…

Read Full News

कुडाळ प. स. मध्ये उद्या शेळीपालन मार्गदर्शन शिबीर…

⚡कुडाळ ता.१९-: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि कुडाळ तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय कुडाळ यांच्या माध्यमातून२० मे रोजी ‘पशुसंवर्धन दिन’च्या औचित्याने ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली अर्थात किफायतशीर शेळीपालन या विषयावर १ दिवसीय मार्गदर्शन शिबीर पंचायत समिती सभागृह कुडाळ येथे सकाळी दहा तेदुपारी एक या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती मिलिंद नाईक असणार आहेत. उद्घाटनउपसभापती सिताराम…

Read Full News

वेंगुर्ला येथील संगीत मैफिलीचा कार्यक्रम तसेच चित्रपट महोत्सव स्थगित…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सांस्‍कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य व वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने वेंगुर्ला शहरात दिनांक २० मे ते २६ मे या कालावधीत सांस्कृतिक व चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. परंतु अवर सचिव, निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे कडील प्रेस नोट क्र. ECI/PN/087/2026 दिनांक १८ मे २०२६ अन्वये…

Read Full News

जिल्ह्यात काँग्रेसची सर्व तालुक्यात होतेय पुनर्बांधणी…

तालुका स्तरावरील पदाधिकारी निवडीसाठी १०० पेक्षा जास्त शिफारसी.. ⚡कुडाळ ता.१९-: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर पुनर्बांधणी होणार आहे. त्यासाठी नवीन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली असून, या निवड प्रक्रियेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, कुडाळ येथील एम आय डी सी रेस्ट हाऊस येथे झाली.या अनुषंगाने महाराष्ट्र…

Read Full News

साटेली-भेडशी केंद्रशाळेचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश…

⚡दोडामार्ग ता.१९-: तालुक्यातील साटेली-भेडशी पूर्ण प्राथमिक शाळेने ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. इयत्ता चौथीच्या परीक्षेला बसलेल्या २२ विद्यार्थ्यांपैकी तब्बल २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये खुशी सत्यवान धर्णे हिने २७४ गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.तसेच इयत्ता सातवीतील फटीराज राकेश धर्णे याने…

Read Full News

मायानिंग प्रकल्प साठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण…?

बाधित गावातील ग्रामस्थांत तीव्र संताप.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सध्या होऊ घातलेला खनिज प्रकल्प,आजगाव पंचक्रोशी (ता.सावंतवाडी) तसेच वेंगुर्ले तालुक्यात ८४०.०० हेक्टर क्षेत्रातील दहा गावांत ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यास दिलेल्या परवान्यांबाबत आजगाव दशक्रोशीत नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून,या जिल्ह्याला निसर्गाचे वरदान आहे.मात्र या समृद्ध अशा जिल्ह्यावर खनिज प्रकल्प वाल्यांची नजर असून…

Read Full News

भर बाजारपेठेत गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी…

लक्ष वेधून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष: नगरसेवक देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर यांची नाराजी.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी नगरपरिषद प्रभाग क्रमांक ६ मधील मुख्य बाजारपेठेतील हॉटेल चंदू भुवन समोरील गटार गेली अनेक वर्षे तुंबलेल्या अवस्थेत असून, गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिक, व्यापारी तसेच परिसरातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरही या समस्येकडे दुर्लक्ष होत…

Read Full News

वेंगुर्ला मठ येथील विविध अपूर्ण कामाबाबत शासनाने लक्ष द्यावे…

मठ कार्यक्षेत्रातील धोकादायक बाबीकडे अजित नाईक यांचे दुर्लक्ष का ? ⚡वेंगुर्ला ता.१७-:वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी विशेष बैठक घेऊन केलेल्या सूचनानुसार वेंगुर्ला सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित काम हाती घेत साईडपट्टी भरावाचे काही भाग वगळता ‘चांगले’ काम केले आहे. त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु एमईसीबी विभाग व संबंधित मक्तेदार मात्र काम करण्याचे…

Read Full News

ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधातील बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज…

रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या उपाययोजना.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१८-: ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेने राज्य व देशात कार्यरत असलेल्या ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात मंगळवार दि. २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अन्न…

Read Full News

You cannot copy content of this page