Headlines

Global Maharashtra Breaking News

सातेरी देवीची श्रावण मास जत्रेला भाविकांची गर्दी

⚡मालवण ता.०८-: मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा श्रावण मासातील वार्षिक जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. या निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा श्रावण मासातील वार्षिक जत्रोत्सव आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरीचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने व फुलांची आरास…

Read More

दहा हजार ध्वज करण्यात आले उपलब्ध

वैभववाडी पंचायत समितीचे नियोजन;अमृत महोत्सव निमित्त होणार भरगच्च कार्यक्रम वैभववाडी संजय शेळके‌ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वैभववाडी पंचायत समितीच्या वतीने दि. 8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर दहा हजार ध्वज पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या मार्फत उपलब्ध करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला मोफत ध्वजचे वाटप करण्यात येते…

Read More

गणेश चतुर्थी पूर्वी रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास आंदोलन

शिवसेना शिष्टमंडळाचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील वर्क ऑर्डर झालेले काही रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. तर काही ठिकाणी ठेकेदाराने कामही सुरू केलेले नाही. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांची तीव्र गैरसोय होणार आहे. त्यामुळे ठेकेदारांचे काय करायचे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहावे, गणेश चतुर्थी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत खड्डेमय रस्ते…

Read More

कुंभारमाठ येथे उद्या हुतात्मा प्रभाकर रेगेंना वाहणार आदरांजली

⚡मालवण ता.०८-: ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त उद्या दि. ९ ऑगस्ट रोजी कुंभारमाठ येथे हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारक येथे सकाळी १० वाजता हुतात्मा रेगे यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे व श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Read More

वैशाली पाटील यांचे निधन

देवगड ता.०८-: जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त प्रबंधक वसंत सिद्धोजी पाटील यांच्या पत्नी सौ. वैशाली वसंत पाटील (६३, रा. सिंधुदुर्गनगरी) यांचे शनिवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पती, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. टेक- फ्लो इंजिनिअर प्रा. लि. मुंबईचे एजीएम…

Read More

तरीही विरोधी भाजप नगर सेवकांचा सभात्याग

सत्ताधारी गटनेते संतोष तारी यांचा आरोप देवगड ता.०८-:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळा हा देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच साजरा केला जात असून या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुणालाही डावलले जात नाही. विरोधक व सत्ताधारी या सर्व नगरसेवकाना विश्वासात घेऊन नगराध्यक्ष व प्रशासन आपल्या परीने सूचना करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या संदर्भात…

Read More

स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा करण्यात आला सत्कार

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांची उपस्थिती;निमित्त स्वातंत्र्य महोत्सवाचे ⚡देवगड ता.०८-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी ८ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या विशेष सभेत नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचे अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव ,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व अन्य नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला . याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत…

Read More

मेजर कौस्तुभ राणे स्मृती दिनानिमित्त पुणे येथे १४ रक्त दात्यांचे रक्तदान

वैभववाडी संजय शेळके‌ शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार रावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रावराणे परिवार व मित्रमंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी आणि राजेश मो पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार सकाळी ९.३० वाजता आर्म फोर्स मेडिकल कॉलेज(AFMC) पुणे येथे जाऊन १४ रक्तदात्यांनी सैनिकांसाठी रक्तदान केले. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी तालुकाध्यक्ष श्री राजेशजी पडवळ यांच्या…

Read More

मुसळधार पावसाने करूळ घाटातील संरक्षक भिंत कोसळली

वैभववाडी संजय शेळकेगेली चार दिवस तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका करूळ घाटाला‌ बसला असून करुळ घाटातील संरक्षक भिंत कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या मार्गावरील संपूर्ण वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.गेले चार दिवस वैभववाडी तालुक्यात जोरदार पावसाची संततधार सुरु आहे. त्याचा सर्वात…

Read More

जिल्ह्याच्या राजधानीत शिक्षकांचे लक्षवेधी आंदोलन

शिक्षक समितीने वेधले प्रशासनाचे लक्ष सिंधुदुर्गनगरी ता ८स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांतील शिक्षण, विद्यार्थी आणि न्यायसंगत मागण्याच्या सोडवणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांना शिकवू द्या. लेकरांना शिकू द्या. अश्या घोषणा देत आज महाराट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन केले. तर आपल्या विविध ३८ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य…

Read More
You cannot copy content of this page