तरीही विरोधी भाजप नगर सेवकांचा सभात्याग

सत्ताधारी गटनेते संतोष तारी यांचा आरोप

देवगड ता.०८-:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळा हा देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊनच साजरा केला जात असून या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुणालाही डावलले जात नाही. विरोधक व सत्ताधारी या सर्व नगरसेवकाना विश्वासात घेऊन नगराध्यक्ष व प्रशासन आपल्या परीने सूचना करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या संदर्भात विशेष सभेचे आयोजन ८ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते .असे असताना त्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. असा आरोप सत्ताधारी शिवसेना गटनेते संतोष तारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नगरसेवकनिवृत्ती तारी, रोहन खेडेकर, तेजस मामघाडी ,विशाल मांजरेकर नितीन बांदेकर ,मनीषा घाडी उपस्थित होते. यापुढे बोलताना गटनेते संतोष तारी म्हणाले, सोमवारी ८ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या विशेष सभेत कचरा व्यवस्थापना करता मागील सत्ताधारी च्या कारकिर्दीत खरेदी करण्यात आलेल्या टेंबवली येथील जागेला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होता व तशा प्रकारचा ठराव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमार्फत करण्यात आला होता. त्या काळात ९८ लाख रुपयांची विकास कामांचा निधी कंपाउंड वॉल व रस्त्या करता मंजूर करण्यात आले होता.तो विकास कामांचा निधी हा अन्य विकास कामांकरिता विकास हा वर्ग करण्यात यावा ही आपली भूमिका असून त्याबाबत आवश्यक ती चर्चा या सभेत करण्यात येऊन त्याला बहुमताने मंजुरी देण्यात आली. यापूर्वीच्या सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी कच्चा निर्मूलन निविदेमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आले होते. यात प्रामुख्याने कचरा घंटागाडी, संक्शन व्हॅन ,फॉगिंग मशीन, यांचा नियमित वापर कमी व प्रत्यक्ष इंधन डिझेल खर्च यावर यावर होणारा खर्च याच बऱ्याच प्रमाणात तफावत आढळून आली होती. या सर्व गोष्टींना सत्ताधारी नगरसेवकांनी आळा घातला असून यापूर्वी झालेल्या कचरा व्यवस्थापन निविदेत तत्कालीन नगराध्यक्ष नगरसेवक हे त्या भ्रष्टाचारांमध्ये सामील होते असा आरोपही संतोष तारी यांनी बोलताना केला. या भ्रष्टाचाराला आळा घातल्याने देवगड जामसंडे नगरपंचायतीचा दीड ते दोन लाखाचा फायदा प्रति महिना होत असून शिवसेनेचा सत्ताधारी नगरसेवकांनी हा भ्रष्टाचार थांबविले असल्याचाही त्यांनी आवर्जून नमूद केले त्यामुळे नागरिकांचा फायदा होणार असून यापूर्वी कचरा व्यवस्थापनामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या बाबत आवश्यक ती माहिती घेऊन याची चौकशी करण्यात ची मागणी आपण संबंधित विभागाकडे करणार आहोत. प्रसंगी त्यांच्या योग्य ती कारवाई अथवा त्यांच्याकडून वसुली करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात येणार असल्याचेही तारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page