वैशाली पाटील यांचे निधन

देवगड ता.०८-: जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्गचे सेवानिवृत्त प्रबंधक वसंत सिद्धोजी पाटील यांच्या पत्नी सौ. वैशाली वसंत पाटील (६३, रा. सिंधुदुर्गनगरी) यांचे शनिवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पती, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. टेक- फ्लो इंजिनिअर प्रा. लि. मुंबईचे एजीएम वैभव पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

You cannot copy content of this page