स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा करण्यात आला सत्कार

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांची उपस्थिती;निमित्त स्वातंत्र्य महोत्सवाचे

⚡देवगड ता.०८-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी ८ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या विशेष सभेत नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांचे अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा गौरव ,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व अन्य नगरसेवक मुख्याधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला .

याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या देवगड जमसंडे नगरपंचायत हद्दीतील शेठ म ग हायस्कूल ,देवगड,आदर्श शाळा जोशी विद्या मंदिर जामसंडे या प्रशाळेतील निबंध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्रक, व गुलाबपुष्प देऊन मानीवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. देवगड जामसंडे नगरपंचायतची विशेष सभा सोमवारी ८ ऑगस्ट रोजी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात पार पडली .यावेळी उपनगराध्यक्ष मिताली सावंत. बांधकाम समिती सभापती तेजस मामघाडी आरोग्य शिक्षण सभापती नितीन बांदेकर, पाणीपुरवठा समिती सभापती संतोष तारी, देवगड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्या. कुर्लीकर मुख्याध्यापक संजीव राऊत उपस्थित होते. या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त देवगड तालुक्याच्या वतीने आयोजित केलेल्या महसूल प्रशासन पंचायत समिती नगरपंचायत यांनी संयुक्त रित्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती प्राध्यापक कुर्लीकर,मुख्याध्यापक संजीव राऊत यांनी देऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सोहळा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचे आवाहन केले.
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या कुटुंबीयांमध्ये स्वातंत्र्य सैनिक परशुराम खडपकर यांचा सन्मान त्यांचे कुटुंबीय सुहास खडपकर
स्वातंत्र सैनिक गोविंद कोरगावकर यांचा गौरव त्यांचा मुलगा नरेश कोरगावकर त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक दिनकर कोरगावकर यांचा गौरव पत्नी निधी कोरगावकर स्वातंत्र्यसैनिक राजाराम कोयंडे यांचा गौरव यांचा मुलगा अभय कोयंडे यांनी स्वीकारला,.या निमित्ताने विशेष कार्यकारी अधिकारी पत्रकार दयानंद मांगले यांनी विचार मांडले व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
या व्यतिरिक्त देवगड जामसंडे नगरपंचायत वतीने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभु,मुख्यधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी दिली.यात दि .८ ऑगस्ट रोजी श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यालय वक्तृत्व स्पर्धा,९ ऑगस्ट जनजागृती प्रभात फेरी,दि.१० ऑगस्ट वृक्षारोपण,देवगड जामसंडे नगरपंचायत,व नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी करण्यात येणार आहे.दि.१०/११/१२ या कालावधीत देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील जि. प.शाळा देवगड,जामसंडे, तरवाडी, खाक्षी, वळकुवाडी, या शाळांमधून चित्रकला ,वक्तृत्व,निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्र मध्ये हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा साक्षी प्रभू,मुख्यधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page