मेजर कौस्तुभ राणे स्मृती दिनानिमित्त पुणे येथे १४ रक्त दात्यांचे रक्तदान

वैभववाडी संजय शेळके
‌ शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार रावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त रावराणे परिवार व मित्रमंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी आणि राजेश मो पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार सकाळी ९.३० वाजता आर्म फोर्स मेडिकल कॉलेज(AFMC) पुणे येथे जाऊन १४ रक्तदात्यांनी सैनिकांसाठी रक्तदान केले.


सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी तालुकाध्यक्ष श्री राजेशजी पडवळ यांच्या संकल्पनेतुन करण्यात आला. त्यानुसार Armed Forces Medical College रक्तपेढी, पुणे येथे जाऊन रक्तसंकलन करण्यात आले.
यासाठी १४ रक्तदात्यांची टीम वैभववाडी येथून पुणे येथे काल सकाळी दिनांक ७ ऑगस्ट रोजी वैभववाडी येथून रवाना झाली. यामध्ये भैया कदम, प्रशांत ढवण, प्रशांत लाड, डॉ युवराज निकम, गुरुनाथ कोलते, प्रशांत सावंत, मुकुंद रावराणे,बंटी रावराणे, किशोर दळवी, संजय गुरखे, तेजस साळुंखे, राजेश पडवळ परेश परूळेकर, सोमकांत केळुसकर आदी सहभागी झाले होते. तेथील सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या टीमचे कौतुक केले.

You cannot copy content of this page