सातेरी देवीची श्रावण मास जत्रेला भाविकांची गर्दी

⚡मालवण ता.०८-: मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा श्रावण मासातील वार्षिक जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरा झाला. या निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा श्रावण मासातील वार्षिक जत्रोत्सव आज शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरीचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने व फुलांची आरास करून सजविण्यात आले होते. तर श्री देवी सातेरी च्या मूर्तीला वस्त्रालंकार व फुलांनी सजविण्यात आले होते. यानिमित्त मंदिरात आज सकाळी १० वाजता श्री देवी सातेरीची विधिवत पूजा अर्चा व धार्मिक विधी पार पडले. देवीच्या दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी।महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांनी नवस फेडले तसेच नवस बोलले.

You cannot copy content of this page