अमृत महोत्सव निमित्त उद्या देशभर राष्ट्रगीत कार्यक्रम

सावंतवाडीत भाजपचे आयोजन;नागरिकांना उपस्थित राहण्याचे संजू परब व अजय गोंदावळे यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.०८-: भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, उद्या संपूर्ण देशात राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानुसार सावंतवाडी भाजप कडून सकाळी ११ वाजता संजू परब यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजू परब व शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page