Headlines

Global Maharashtra Breaking News

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार 29 मे पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर …

⚡कणकवली ता.२८-:राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार 29 व शनिवार 30 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Read Full News

कणकवलीत उद्या वीज ग्राहकांची “गरमागरम चाय पे चर्चा”…

महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार:वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी संघटना यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढत्या वीज समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना आणि कणकवली तालुका वीज ग्राहक संघटना यांच्या संयुक्त पुढाकारातून उद्या शुक्रवार दिनांक २९ मे २०२६…

Read Full News

मठ – पालकरवाडी मार्गांनजिकभराव खचल्याने अपघाताची शक्यता…

सरपंच बंड्या पाटील ;झाडे लावली देखभाल दुरुस्तीचे काय..? ⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला कुडाळकडे जाणाऱ्या मुख्य मार्गानजिक मठ कुडाळतिठा ते पालकरवाडी नमसवाडी या मुख्य मार्गांनजिक अंडरग्राउंड विजवाहिन्यांचे काम करण्यात आले आहे.परंतुमठ कुडाळतिठा पालकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गांनजिक कुडाळसडा येथील एरियात बऱ्याच ठिकाणीभराव खचल्याने दिवसा व रात्रीही अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी…

Read Full News

कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त दीर्घ काव्यलेखन स्पर्धा…

विजेत्या कवीला 10 हजारांचे पारितोषिक ;समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचा उपक्रम.. ⚡कणकवली ता.२८-: कामगार – श्रमिकांच्या व्यथांना शब्दरूप देणारे क्रांतिकवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने खुली दीर्घ काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एका कवितेस ‘नारायण सुर्वे पारितोषिक’ म्हणून 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ प्रदान करण्यात येणार…

Read Full News

सिंधुदुर्गात अधिकाऱ्यांवर राणे कुटुंबाचा वचक राहिलेला नाही…

परशुराम उपरकर:अवैध धंदे, पोलीस संरक्षण आणि भ्रष्ट कारभारावर पत्रकार परिषदेत घणाघाती टीका.. ⚡कणकवली ता.२८: पालकमंत्री नितेश राणे आणि केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेत असलेल्या राणे कुटुंबाला सिंधुदुर्गातील अधिकारी मानत किंवा ऐकत नसल्याची घणाघाती टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असून त्यांना पोलीस संरक्षण मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत होता….

Read Full News

विक्रांत सावंत यांचा वाढदिवससामाजिक उपक्रमांनी साजरा…

⚡सावंतवाडी ता.२८-: जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्यावतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री ओटवणे हायस्कूलच्या…

Read Full News

संघर्षावर मात करत समाजसेवेचा वसा जपणारे विक्रांत सावंत…

⚡सावंतवाडी ता.२८-:समाजकारण, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवत हजारो कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले जिल्हा परिषद सदस्य तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. माजी आरोग्यमंत्री स्व. भाईसाहेब सावंत आणि शिक्षणमहर्षी स्व. विकासभाई सावंत यांच्या विचारांचा आणि कार्याचा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेत…

Read Full News

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडू दिलासा मिळणार…

*मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसानीच्या मदतीची मागणी.. ⚡नवी दिल्ली दि.२७-: कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली.यावेळी आंबा…

Read Full News

कणकवली रेल्वे स्थानकाला प्रवासी सुविधांची मोठी भेट…

सरकता जिना सेवेत; प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर १६० मीटर नव्या शेडला मंजुरी.. कणकवली : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कणकवली रेल्वे स्थानकातील दोन महत्त्वाच्या प्रवासी सुविधा मार्गी लागल्या आहेत. कणकवली स्थानकातील सरकता जिना आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर १६० मीटर लांबीच्या नव्या…

Read Full News

कणकवलीत मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी…

उकाड्यापासून नागरिकांना दिलासा:बुधवारी दुपारनंतर वातावरणात गारवा, शेतकऱ्यांमध्ये समाधान.. ⚡कणकवली ता.२७-: कणकवली परिसरात बुधवारी दुपारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे संपूर्ण परिसरात वातावरण पाऊसमय झाले असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ढगाळ वातावरण आणि…

Read Full News

You cannot copy content of this page