Global Maharashtra Breaking News

कणकवली तहसील कार्यालय परिसर स्वच्छतेची जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केली पाहणी

⚡कणकवली ता.०४-: जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयाला भेट दिली.कणकवली तहसीलदार कार्यालय परिसर स्वच्छता त्याचप्रमाणे परिसर सुशोभीकरण उपक्रमाबद्दल तहसीलदार आर.जे.पवार व सहकाऱ्यांचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कौतुक केले आहे. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे.कणकवलीत झेंडा वाटप जनजागृती अभियान शुभारंभ कणकवली पंचायत समिती येथे पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,मुख्य कार्यकारी…

Read More

महामार्ग प्राधिकरण विरोधात नागेश मोरये यांचे पुन्हा कणकवली प्रांत कार्यालयासमोर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

समस्या सोडविण्यासाठी संयुक्त पाहणी केली नसल्याचा आरोप.. ⚡कणकवली ता.०४-: महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत . परिणामी नांदगाव येथील भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत . तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे . अनेक ठिकाण जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही . या सर्व…

Read More

रानभाज्या महोत्सवाला अभिनेते अनिल गवस यांची उपस्थिती लाभणार

⚡कणकवली ता.०४-:कणकवली येथे स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाच्या 16 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून होणाऱ्या “रानभाज्या महोत्सवाला”स्वराज्य रक्षक संभाजी मधील हंबीर मामा व स्वामिनी मालिकेतील संताजी ची भूमिका गाजवणारे अनिल गवस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे महाविद्यालयीन युवक युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.कोरोना काळात आरोग्याचे महत्त्व सर्व नागरिकांना…

Read More

शेर्पे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मोफत वह्या वाटप

सत्कर्म फाऊंडेशनच्यावतीने शैक्षणिक उपक्रम ⚡कणकवली ता.०४-: सत्कर्म फाऊंडेशनच्या वतीने शेर्पे माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि शेर्पे,बेर्ले,कुरंगवणे गावातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

Read More

मसुरेचा लक्ष परब रौप्य पदकाचा मानकरी

हरिद्वार येथे राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक कॅरम स्पर्धेचे आयोजन ⚡मालवण ता.०४-: उत्तराखंड हरिद्वार येथे आयोजित ९ व्या राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक कॅरम स्पर्धेत मसुरे देऊळवाडा येथील लक्ष अश्विन परब याने रौप्य पदक पटकावले आहे. मुंबई डोंबिवली येथे आय ए एस पाटकर या विद्यालयात नववीत शिकत असलेला लक्ष परब याने यापूर्वी शहरी आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत अनेक बक्षिसे…

Read More

मालवणात ६ रोजी ‘बरसती रंगसरी’ कार्यक्रम

⚡मालवण ता.०४-: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मालवण व नगर वाचन मंदिर मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ६ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता मामा वरेरकर नाटयगृह येथे नृत्य, नाटय आणि संगीत या कलाविष्कारांचा भरणा असलेला ‘बरसती रंगसरी- ४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०१७, २०१८ व २०१९ अशी सलग…

Read More

शिक्षकांचा पगार ऑगस्टमध्ये जमा करावा

जिल्हा मध्यामिक अध्यापक संचाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन मालवण : (प्रतिनिधी) गणेश चतुर्थीपूर्वी ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचा पगार खात्यात जमा करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर, राज्य सहसचिव लक्ष्मण पावसकर, राजेंद्र परब, तुकाराम पेडणेकर, सुधाकर आडेलकर यांच्या…

Read More

स का पाटील महाविद्यालयात १३ रोजी समरगीत गायन स्पर्धा

रोटरी क्लबचे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन मालवण (प्रतिनिधी) स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मालवणतर्फे १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे शालेयस्तरीय समरगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्राथमिक (पहिली ते चौथी) व माध्यमिक (पाचवी ते दहावी) अशा दोन गटात होणार आहे. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास चषक…

Read More

शिवरायांची युद्धनिती जागतिक औत्सुक्य

सतीश लळीत: सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने कारगिल विजय दिन साजरा ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीति आणि गनिमी काव्याचे तंत्र हा जगातील अनेक देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांचा आणि युद्धतज्ञांच्या अभ्यासाचा, औत्सुक्याचा विषय आहे. साडेतिनशे वर्षांनंतरही ती कालबाह्य झालेली नाही, असे प्रतिपादन निवृत्त प्रशासकीय अधिकारी सतीश लळीत यांनी नुकतेच व्यक्त केले.

Read More

कंटेनर व बसमध्ये अपघात

कारीवडे उभागुंडा येथील घटनाविद्यार्थी किरकोळ जखमी ⚡सावंतवाडी ता.०४-:येथील उपरलकर देवस्थान पुढील कारिवडे- उभागुंडा वळणावर कंटेनर ट्रक आणि एस्टी बस यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला असून, या अपघातात बस मधील काही विद्यार्थी किरकोळ जख्मी झाले आहेत, घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. ही घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Read More
You cannot copy content of this page