फेक कॉलपासून सावधगिरी बाळगा
कणकवली पोलिसांनी केले नागरिकांना आवाहन

⚡कणकवली ता.१२-: सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली असताना फेक कॉल करत आर्थिक फसवणुकीचे प्रकारही राज्याच्या काही भागात सुरू झाले आहेत. त्यामुळे अशा फेक कॉलपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केले आहे.

याबाबत उदाहरण देताना पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर म्हणाले, आपले मोबाईल नंबर अनेक ठिकाणी अटॅच असतात. असे मोबाईल हेरुन फसवणुक करणारे त्या मोबाईल धारकाला फेक कॉल करतात. आम्हाला एका ठिकाणी सोने सापडले आहे जर ते पोलिसांकडे दिले तर शासन दरबारी जमा होणार आहे. त्यामुळे हे सोने आम्ही तुम्हाला कमी किमतीमध्ये देतो तुम्ही त्याचे काय ते करा आणि अधिक पैसे कमवा असे आमिष दाखवले जाते.

You cannot copy content of this page