ओरोस ता.१२-:आयडल इंग्लिश स्कूल वरवडे आणि डॉ. राज अहमद हुसेनशा पटेल आयोजित चॅरिटेबल ट्रस्ट हरकुल बुद्रुक येथे ७ ऑक्टोंबर रोजी श्रावणधारा जिल्हास्तरीय शालेय सुगम संगीत स्पर्धा 2022 ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुक या प्रशालेचा इयत्ता 5 वी चा विद्यार्थी कु. ध्रुव विजयकुमार गोसावी याने इयत्ता 5 वी ते 7 वी या गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. यानिमित्त धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसालच्यावतीने व न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुकचे मुख्याध्यापक अनंत साईल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.
जिल्हास्तरीय सुगम संगीत स्पर्धेत ध्रुव गोसावी द्वितीय
