प्रशालेच्या नवीन वास्तूतही सुरूच-:अध्यक्ष आनंद सावंत
ओरोस ता..१२-:
ओरोस हायस्कुलने आपल्या निर्मिती काळापासून अनेक खेळाडू या जिल्ह्याला आणि विभागाला दिलेले आहेत.नवीन वास्तूत शाळा सुरू झाल्यावर हीच परंपरा शाळेने सुरू ठेवली याचा अध्यक्ष म्हणून मला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन कसाल शिक्षण संस्था अध्यक्ष आनंद सावंत यांनी बोलताना काढले.
शनिवार ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खो-खो निवड चाचणीमध्ये (मुले /मुली) सौरभ स्पोर्ट्स हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सौरभ स्पोर्ट्स मधून सिंधुदुर्ग संघात निवड करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ओरोस (सिंधुदुर्गनगरी) हायस्कूलच्या तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात मुलांमधून सम्यक पेंडूरकर, आदित्य राठोड व मुलींमधून कु. सानिका खंडवी यांची निवड करण्यात आली, तसेच जिल्हास्तरीय सुगम संगीत गायन स्पर्धेत ५ ते ८ या गटात ध्रुव विजयकुमार गोसावी याने द्वितीय क्रमांक पटकावला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना लाभलेल्या प्रशिक्षकांचे धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसालच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थाध्यक्ष आनंद सावंत, सचिव यशवंत परब, शालेय समिती अध्यक्ष प्रभाकर सावंत, विश्वस्त अवधूत मालवलणकर,कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक गुरुनाथ कुसगावकर, श्री रायबान या मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशाळेचे मुख्याध्यापक अनंत साईल, प्रशिक्षक सिद्धेश डोंगरे, गोसावी, क्रीडा शिक्षक एस एस सावंत, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष सावंत यांनी ओरोस (सिंधुदुर्गनगरी) हायस्कुल हे जि प च्या भाड्याच्या इमारतीत कार्यरत होते, तत्कालीन अपूर्ण सोयी सुविधांवर मात करत शाळेच्या शिक्षकांनी क्रीडा, संगीत, नाट्य अशा अनेक कलांमध्ये प्राविण्य मिळविले. क्रीडा क्षेत्रात चमकलेले २५ हुन अधिक विद्यार्थी आज पोलीस आणि समकक्ष विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे शाळेच्या नव्या परिपूर्ण वास्तूत यशाचा तोच वारसा मोठ्या स्वरूपात चालू राहील यात शंका नाही, असे सांगितले.
