Headlines

Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे…

*माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. ⚡कणकवली ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या तात्पुरत्या /रोजंदारीवर लिपिक पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन त्यांच्या भविष्याबाबत न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नेते ,माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद…

Read Full News

…तर मग नुसते आरोप करण्यामागचा उद्देश काय ?

मनसेच्या कुणाल किनळेकर यांचा आमदार निलेश राणेंना सवाल.. ⚡कुडाळ ता.३-: महाराष्ट्राच्या सरकार मधिल सत्ताधारी पक्षाचे आमदार निलेश राणे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्रकार परिषदा घेऊन न्याय मागत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जावे. कुंपणच जर का शेत खात असेल आणि कुंपणाचा मालकच केवळ आरोप करणार असेल तर मग यावर कारवाई नेमकं कोण करेल असा प्रश्न…

Read Full News

शासकीय मैदान साफसफाईसाठी ठाकरे सेना सरसावली…

४ जून रोजी ‘मैदान स्वच्छता मोहीम’:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.३१-: शहरातील तहसीलदार कार्यालयाशेजारील शासकीय क्रीडा मैदानावर सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले असल्याच्या तक्रारी येत आहेत. क्रीडाप्रेमी आणि सुजाण नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना कुडाळ शहराच्या वतीने या मैदानावर ४ जून रोजी सकाळी…

Read Full News

सावंतवाडीच्या अक्षय-नुपूर मठकर दाम्पत्याची माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई; मायभूमीत जंगी स्वागत…

⚡सावंतवाडी ता.३१-: येथील अक्षय मठकर आणि नुपूर मठकर या दांपत्याने जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गिर्यारोहक जोडप्याने प्रतिकूल हवामानावर मात करत हे खडतर आव्हान पूर्ण केले. यामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या साहसी कामगिरीचे संपूर्ण कोकणात व महाराष्ट्रात कौतुक…

Read Full News

सावंतवाडीला २० नव्या गाड्या देणार…

मंत्री प्रताप सरनाईक: आमदार दीपक केसरकर यांनी केले जंगी स्वागत.. सावंतवाडी ता.३१-: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सावंतवाडीत आले असता त्यांचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी श्री. नाईक यांनी सावंतवाडी बस स्थानकाची देखील पहाणी केली. २० नव्या गाड्या सावंतवाडीला देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. मंत्री श्री. सरनाईक यांचे दीपक…

Read Full News

सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळे…

नैतिकता असेल तर राजीनामा द्या:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाईकांना आव्हानं.. ⚡कणकवली ता.३१-:आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा.नाहीतर यापुढे राणे कुटुंबियांवर टीका करण्याची हिम्मत करू नये. असा स्पष्टच इशारा माजी नगराध्यक्ष समीर…

Read Full News

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कणकवली बसस्थानकाला भेट…

नगरपंचायतीकडून अतिरिक्त जागेची मागणी.. कणकवली : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कणकवली बसस्थानकाला भेट देत बसस्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. या भेटीदरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, नगरसेवक संकेत…

Read Full News

‘मन की बात’ निमित्त भाजप नगरसेवकांचा वॉर्ड दौरा…

नागरिकांच्या समस्या घेतल्या जाणून.. ⚡सावंतवाडी ता.३१-: शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातच्या निमित्ताने नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांसह सभापती, भाजप नगरसेवकांनी १० ही प्रभागात जात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. मन की बात कार्यक्रमांचे आयोजन बुथ प्रमुखांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर…

Read Full News

रुपेश राऊळ यांनी आमदार दीपक केसरकर यांची बदनामी करू नये; अन्यथा सर्व तुमच्या कुंडल्या बाहेर काढू…

संजू परब यांचा इशारा: पंचवीस वर्षे राजकारण करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा अधिकृत व्यवसाय जनतेसमोर मांडावा आणि त्यानंतरच दीपक केसरकर यांच्यावर बोलावे… ⚡सावंतवाडी ता.३१- : रुपेश राऊळ यांनी विनाकारण आमदार दीपक केसरकर यांची बदनामी करू नये, अन्यथा त्यांना उघडे पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला…

Read Full News

सावंतवाडी भाजप जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब, विकास परब, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, श्रीकांत राजाध्यक्ष, साईप्रसाद…

Read Full News

You cannot copy content of this page