Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीतील सा. बां. उपअभियंता गणेश कर्वे यांचे निधन

⚡कणकवली ता.०१-: सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गणेश ज्ञानेश्वर कर्वे (४५) यांचे सोमवारी रात्री निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या काम करण्याच्या सकारात्मक पद्धतीमुळे वर्षभरातच तालुक्यात अनेकांशी स्नेहाचे संबंध निर्माण केले होते.गेले काही महिने गणेश कर्वे यांना पोट विकाराचा त्रास होता व त्यावर उपचारही सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने…

Read More

झाराप-पत्रादेवी मार्गांवर मळगाव येथे चारचाकी गाडी पलटी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने घडली घटना ⚡सावंतवाडी ता ०१-: झाराप-पत्रादेवी मार्गांवर मळगाव ब्रिज जवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने चारचाकी गाडी जवळील शेतात पलटी झाली. ही घटना आज सकाळी घडली आहे. यात गाडीचे नुकसान झाले असून कोणाला दुखापत झाली आहे हे मात्र समजू शकले नाही

Read More

मडुऱ्यातील रेशनधारकांना सर्व्हर डाऊनचा फटका

ग्राहकांना परताव लागतंय रिकाम्या हाती : सर्वांना धान्य मिळणार असल्याचा तहसीलदारांचा विश्वास ⚡बांदा ता.०१-: मडुरा, रोणापाल, पाडलोस गावासाठी असलेल्या मडुरा रास्त दराच्या धान्य दुकानात ई-पॉस मशीनचा सर्व्हर गेले अनेक दिवस डाऊन असल्यामुळे धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. याचा मोठा फटका तीन गावांतील शेकडो रेशनकार्डधारकांना बसला. महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्वस्त धान्य न मिळाल्याने लाभार्थी दिवाळीमध्ये धान्यापासून…

Read More

तळवडे येथील डबल भजन बारीचा भाजप युवा नेते विशाल परब यांनी केले उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.३१-: म्हाळाई देवी कलाक्रिडा मंडळ तळवडे यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या डबल बारी भजन जंगी सामन्याचे उद्घाटन भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला.

Read More

हत्ती नुकसानीची भरपाई १५ दिवसांत पोहोच होईल

उपवनरक्षक नवकिशोर रेड्डी यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन सावंतवाडी ता. ३१: दोडामार्ग तालुक्यात हत्तींपासून झालेल्या नुकसानीची भरपाई येत्या १५ दिवसात नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाईल. तसेच वनविभागाच्या माध्यमातून हत्ती प्रतिबंधक सोलर कुंपण उभारण्यात येईल, असे आश्वासन उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान हत्तींचा जास्त वावर असलेल्या गावात स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी…

Read More

पालकांनी पाल्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा

वाय आर राजूरकर यांचे आवाहन मालवण दि प्रतिनिधीएक मनुष्य सारे जग बदलू शकतो एवढा आत्मविश्वास प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बाळगला तर आयुष्याला फार मोठी कलाटणी मिळेल शिवाय समाजालाही वेगळी दिशा मिळेल म्हणून प्रत्येकाने आपल्या पाल्यामध्ये आपण पुष्कळ काही करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करावा असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. वाय….

Read More

वायरी येथे ५ रोजी रंगभूमी दिन

⚡मालवण ता.३१-: वायरी भूतनाथ येथील प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या निवासस्थानी ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन साजरा होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ७ वा. नटराज मूर्तीचे पूजन होणार आहे. तरी सर्वानी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन भूतनाथ नूतन नाट्य समाज या मंडळाने केले आहे.

Read More

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त “हे चांदणं फुलांनी” कार्यक्रम
सावंतवाडी येथे सलग पाचव्या वर्षी आयोजन

⚡सावंतवाडी ता.३१-: श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी व दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सावंतवाडी नगरपरिषदेच्या सहकार्याने सलग पाचव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निसर्ग, चंद्र व चांदणे या संकल्पनेवर आधारित “हे चांदणे फुलांनी…”जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा व नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

“तुळस सजवा, आकर्षक बक्षिसे मिळवा” स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.३१-: तुळशी विवाह निमित्त भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी ” तुळस सजवा… आकर्षक बक्षीसे मिळवा ” ही आगळी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील विजेत्या महिलेला मिक्सर ग्राईंडर तर उपविजेत्या महिलेला इंडक्शन कुकटॉप मिळणार आहे. याशिवाय या स्पर्धे दरम्यान विशेष पारितोषिक देखील ठेवण्यात आले आहे. कोकणात व खास करून…

Read More

गिर्ये पवनचक्कीची २६ हेक्टर जागा मत्स्य महाविद्यालयाला द्या

आ नितेश राणे यांची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मागणी ⚡देवगड ता.३१-: गिर्ये पवनचक्की प्रकल्पातील जमिनीपैकी २६ हेक्टर जागा नियोजित मत्स्य व्यवसाय महाविद्यालयासाठी द्यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना निवेदन देऊन केली आहे. या निवेदनात ते म्हणतात की देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे मत्स्यव्यवसाय महाविद्यालय मंजूर करणेसाठी मी मत्स्य व्यवसाय…

Read More
You cannot copy content of this page