मालवण दि प्रतिनिधी
मालवण येथील नगर वाचन मंदिरने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशाभिमान जागृत करणाऱ्या विविध विषयावरील पुस्तकाचे प्रदर्शन तसेच
स्वराज्य’ हा देशभक्तीपर गीतांचा श्रवणीय कार्यक्रम सादर करून साजरा करण्यात आला
मालवण येथील नगर वाचन मंदिराच्या ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशाभिमान जागृत करणाऱ्या विविध विषयावरील पुस्तकाचे प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे नियमित वाचक अनिल वेिकर यांच्या हस्ते पार पडले तर सायंकाळी ‘स्वराज्य’ हा देश भक्तीपर गीतांचा श्रवणीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात एक राजा इथे जन्माला’ या गीताने जगदीश तोडणकर यांनी सादर केल्यानंतर सौ. अक्षता तांबे यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत सुंदररित्या सादर केले. तर सौ गौरी पराडकर यांनी ‘देश रंगीला’, दत्तात्रय डोंगरे यांनी शूर आम्ही सरदार’ जगदीश तोडणकर यांनी ‘ये प्रित जहा की रित सदा है लोकप्रिय गीत सादर केले कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संदेसे आते है’ हे गीत जगदीश तोडणकर व शिवाजी दोमणी यांनी सादर केले. त्यानंतर कर चले हम फिदा’ हे गीत संजय शिंदे यांनी सादर करून कार्यक्रमात बहार आणली. त्यानंतर ‘मेरा कर्मा तु मेरा धर्मा हे सुपरहिट गाणे अक्षता तांबे, गौरवी पराडकर व संजय शिंदे यांनी सादर करून कार्यक्रमाचा दर्जा राखला. त्यानंतर ‘मेरे देश की धरती जगदीश तोडणकर यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली त्यानंतर कार्यक्रमाची सांगता ऐ मेरे वतन के लोगो है अजरामर गीत अक्षता तांबे यांनी सादर करून कार्यक्रमाची उंची वाढविली.
या गाण्याच्या वेळी उपस्थितांनी उभे राहून हुतात्मांना श्रदांजली अर्पण केली. या कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था संतोष मयेकर यांनी सांभाळली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती
