स. का.पाटील कॉलेजमध्ये सन्मान देशभक्तांचा आणि मशाल फेरी कार्यक्रम संपन्न…

मालवण दि प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मालवणचे तहसीलदार अजय पाटणे मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली
स का पाटील सिंधुदुर्ग कॉलेजच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागामार्फत स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सन्मान देशभक्तांचा व मशाल फेरी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सन्मान देशभक्ताचा या कार्यक्रमासाठी नऊ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, तसेच १९ पदव्या ज्यांनी प्राप्त केलेले आहेत अशा ब्रिगेडियर एस व्ही सरस्वती यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना सैन्याच्या विविध क्षेत्रात असणाऱ्या रोजगार संधी याबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी विजय केनवडेकर, साईनाथ चव्हाण , संदेश कोयंडे, सचिव गणेश कुशे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, नंदकुमार देसाई, प्राचार्य डॉ.उज्वला सामंत आदी मान्यवर व इतर उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय ते मामा वरेरकर नाट्य गृह ते भरड नाका मार्गे फोवकांडा पिंपळ ते पुन्हा महाविद्यालय अशी मशाल फेरी काढण्यात आली. मशाल फेरीचे उद्घाटन तहसीलदार अजय पाटणे व ब्रिगेडियर एस व्ही सरस्वती (आंध्र प्रदेश) यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरपालिका अधिकारी निखिल नाईक ,निलेश घाडगे, सोनाली हळदणकर महेश परब , लायन्स क्लबच्या अध्यक्षा वैशाली शंकरदास व अनुष्का चव्हाण, अंजली आचरेकर, विनोद शंकरदास इतर सर्व मेंबर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळकर नगरसेवक माजी दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर , माजी नगरसेवक यतीन खोत मंदार केणी , गणेश कुशे, शिल्पा खोत, स्वराध्या फाउंडेशनचे उपाध्यक्ष गौरव ओरसकर राजू बिडये, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी विद्यार्थी संघटना सचिव अमेय देसाई, विघ्नेश मांजरेकर, वैभव खोबरेकर, ललित चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे डेप्युटी रजिस्ट्रार सावळे , श्री. जाधव नायब तहसीलदार श्री कोकरे पोलीस निरीक्षक विजय यादव , डॉ. गार्गी ओरस्कर , एसटी आगार प्रमुख सचेतन बोवलेकर व इतर कर्मचारी, कॉलेजमधील प्राध्यापक वर्ग ऑफिस स्टाफ, आजी-माजी विद्यार्थी असे
मशाल फेरीमध्ये सुमारे ५०० पेक्षा अधिक लोक सहभागी होते. एसटी आगारची खास अमृत महोत्सवानिमित्त सजवलेली एसटी सुद्धा यामध्ये सहभागी होती.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन लेफ्टनंट प्रा. डॉ. एम आर खोत, एनसीसी सीनियर्स तेजस पोळ, नारायण मुंबरकर, प्रीती बांदल, मिथिल मोर्वेकर, पूर्वा कोयंडे, तृप्ती माडीये यानी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा के के राबते यांनी केले

You cannot copy content of this page