आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार उत्सव
वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तालुका भाजपा व महाकाली कंट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. वैभववाडी – तरळे मार्गावर पोलीस स्टेशन समोरच्या इनामदार प्लाझा पटांगणावर हा उत्सव संपन्न होणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रुपये 51 हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच चार, पाच, सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 1000 व सन्मानचिन्ह तसेच सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 2000 व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. आयोजक उद्योजक विजय तावडे, कु. कौस्तुभ तावडे, विनय राणे कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
या उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. डान्सिंग, सिंगिंग व लावणी ग्रुप मुंबई बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. या दहीहंडी उत्सवात जिल्ह्यातील गोविंदा पथकाने सहभागी व्हावे, तसेच वैभववाडी वासीयांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष नासीर काझी व विजय तावडे यांनी केले आहे.
