⚡सावंतवाडी ता.१८- : तालुक्यातील माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली या विद्यालयात अमृत महोत्सवाची सांगता गुरुवारी झाली. सर्वप्रथम समुह राष्ट्रगीत गायन म्हणण्यात आले. त्यानंतर किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी मळेवाड उपआरोग्य विभागाचे अधिकारी श्रीम. धाकोरकर, समुदाय आरोग्य अधिकारी, व श्रीम बांदेकर, आरोग्य परिचारिका यांनी मार्गदर्शन केले.
तसेच मुलांना डॉ. खडपकर यांनी विद्यार्थ्यांना ‘आपल्या आरोग्याची काळजी’ या संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक जी. एस. मोर्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमास एन. जे. गवंडळकर, ए. व्हि. तेरसे, पी. जी. काकतकर, पी. एम. सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.
माऊली विद्यालय सोनुर्लीत अमृत महोत्सवाची सांगता
