जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला संपन्न
बांदा /प्रतिनिधी
. इन्सुली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी च्या वतीने भव्य शेतकरी मेळावा नूतन माध्यमिक विद्यालय येथे जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर संचालक गजानन गावडे रविंद्र मडगावकर, विद्या परब, डॉ. प्रसाद देवधर, सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, माजी संचालक प्रमोद कामत, चेअरमन गुरुनाथ पेडणेकर, अशोक सावंत, उमेश पेडणेकर, विकास केरकर, सौ मानसी धुरी, सौ जागृती गावडे, प्रमोद परब, कृषी विभागाचे श्री वाघमोडे आदी उपस्थित होते.
यावेळी मनिष दळवी यांनी इन्सुली संस्था करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे बॅकेच्या वतीने संस्था सक्षमीकरणासाठी विविध योजना करण्यात आल्या आहेत शेतकरी केंद्रबिंदू मानून जिल्हा बॅक कार्य करत आहे. शेती पूरक व्यवसाय म्हणून दुधाळ जनावरे शेळी – मेंढी पालन कुकुटपालन यासारखे व्यवसाय करावे त्यासाठी युवकांनी पुढाकार घेवून उद्योजक बनले पाहिजे. यावेळी श्री देवधर म्हणाले भविष्यात शेती शिवाय पर्याय नाही आज तरुण पिढी मोबाईल च्या जगात वावरत आहे हे थांबले पाहीजे, तर शेतीकडे वळणे आवश्यक आहे. यावेळी गजानन गावडे रविंद्र मडगावकर विद्या परब अशोक सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित संस्थेच्या 75 जेष्ठ सभासदांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच नूतन माध्यमिक विद्यालयाच्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका सौ सुविद्या विकास केरकर यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. मेळाव्याचे औचित्य साधून महिलांसाठी पाककला स्पधेचेही आयोजन करण्यात आले होते. यात तांदळाचे पदार्थ प्रथम क्रमांक सौ. शितल शिवाजी पोपकर द्वितीय क्रमांक प्रभावती सहदेव सावंत, तृतीय सौ. स्नेहा सुभाष तावडे उतेजनार्थ सौ सुचिता राजेंद्र शिंदे. नाचणीचे पदार्थ प्रथम क्रमाक सौ. चेतना रुपेश पालव व्दितीय सौ. संगिता सुनिल गावडे तृतीय क्रमांक सौ. हर्षदा गंगाराम पेडणेकर उत्तेजनार्थ सौ सिद्धी सहदेव सावंत यांनी मिळविला.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन गुरुनाथ पेडणेकर सुत्रसंचलन सौ. गौरवी पेडणेकर तर आभार गटसचिव सौ. अस्थिनी तावडे यांनी मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :-
इन्सुली येथे शेतकरी मेळाव्याचे दीपप्रज्वलनं करून उदघाटन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. सोबत इतर मान्यवर. (छायाचित्र – निलेश मोरजकर )
