तर मोठ्या गटात श्रावणी आरावंदेकर प्रथम; स्पर्धेला दोन्ही गटात उत्स्फूर्त प्रतिसाद…
बांदा/प्रतिनिधी
इन्सुली येथील उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ इन्सुली पुरस्कृत व विद्याविकास मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात चिन्मय विक्रम कोटणीस (जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नंबर २) याने तर मोठ्या गटात श्रावणी राजन आरावंदेकर (कुडाळ हायस्कुल) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
ही स्पधी लहान गट – इ . 5 वी 7 वी तर मोठा गट इयत्ता 8 वी ते 10 वी गटात घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळ इन्सुली अध्यक्ष उमेश पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे सचिव विकास केरकर, मुख्याध्यापिका विद्या केरकर, विकास संस्था चेअरमन गुरुनाथ पेडणेकर, मंडळाचे अध्यक नितीन राऊळ, पत्रकार निलेश मोरजकर, प्रवीण मांजरेकर, साबाजी परब, महेंद्र सावंत, महेंद्र पालव, प्रितेश पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
लहान गटात शमिका सचिन चिपकर (कुडाळ हायस्कूल), सई स्वागत नाटेकर (कळसुलकर सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलाम उत्तेजनार्थ पारितोषिक किमया संतोष परब (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १), अस्मि प्रविण मांजरेकर यांना देण्यात आले. मोठ्या गटात रेश्मा संदेश पालव (इन्सुली हायस्कूल), मकरंद आपटे यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विधी विक्रम कोटणीस (कळसुलकर, सावंतवाडी) नंदिनी नितिन धुरी (व्ही. एन. नाबर स्कुल बांदा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण भरत गावडे, गुरुनाथ नार्वेकर, चंद्रकात सावंत, श्री प्रभू यांनी केले.
पारितोषिकांचे वितरण संस्थेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, कृष्णाजी कोठावळे, सचिव विकास केरकर, सचिन पालव, ग्रामपंचायत सदस्या सौ वर्षा सावंत, पोलिस पाटील जागृती गावडे, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, रामचंद्र पालव, पिन्टो नाईक, समिर सावंत, शाळेचे सर्व शिक्षक – शिक्षीका यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विशाखा विश्राम पालव यांनी केले.
फोटो :-
इन्सुली येथे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित मान्यवर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
