⚡मालवण ता.१८-: नगर वाचन मंदिर, मालवण व डॉ. नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्यावतीने मालवण तालुक्यातील दहावीच्या केंद्रातून संपुर्ण संस्कृत विषय घेऊन प्रथम चार विद्यार्थी विद्यार्थीनीचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार ग्रंथालयाच्या सभागृहात करण्यात आला.
कु. तन्वी गणपत चौकेकर ( ९९.२०%), कु. मानसी निलेश करलकर (९४.४०%), कु. राघव सतिश वझे ( ९१.५०%), कु श्रावणी हेमंत पेडणेकर ( ९०.६०%) या विद्यार्थी- विद्यार्थीनींना प्रत्येकी शिष्यवृत्ती रक्कम रू. १०,०००/- ( अक्षरी रु. दहा हजार मात्र) देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती रक्कमेचा धनादेश विद्यार्थी- विद्यार्थीनींना देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह नागेश कदम, अ.शि. दे. टोपीवाला हायस्कुलचे शिक्षक खानोलकर, अॅड. पलाश चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर, रविंद्र वराडकर, रामकृष्ण जोशी व ग्रंथपाल संजय शिंदे तसेच ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
