⚡मालवण ता १८-: बॅ. नाथ पै सेवांगणच्या कट्टा येथील शाखेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा संध्या समुद्र यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पुस्तक प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच यानिमित्त ३० गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
विद्या कुलकर्णी यांचे हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन, रश्मी पाटील यांचे हस्ते नवीन शिवण वर्गाचे उद्घाटन तर दीपक भोगटे यांनी रेखाटलेल्या ७५ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार हरेश चव्हाण, लक्ष्मण भिसे आणि अॅड. संजय खेर यांच्या हस्ते झाले. संध्या समुद्र व विद्या कुलकर्णी यांनी या सुंदर उपक्रमाविषयी सेवांगणला यावेळी धन्यवाद दिले. आकेरकर यांनी दीपक भोगटे हा माझा विद्यार्थी असल्याचे सांगत त्यांनी आपली चित्रकला स्व:कष्टाने जपल्या बद्दल कौतुक केले. कलाकार हरेश चव्हाण यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात जिद्द असेल तर माणूस काय करू शकतो याचे दीपक भोगटे हे उत्तम उदाहरण असे सांगत सर्वानी जिद्दीने आवडीने एखादी कला जोपासल्यास जीवन आनंदी होईल असे सांगितले. दीपक भोगटे यांनी स्वातंत्र लढ्यातील सर्व हुतात्म्याना आदरांजली वाहिली. किशोर शिरोडकर व प्रसाद परुळेकर यानी स्वातंत्रयाचा लढा व त्यातील अनेकांचे योगदान याबद्दल माहिती दिली.
मिथिला नागवेकर व आकेरकर यानी दोन गरीब गरजू महिलाना शिवणयंत्रे भेट दिली. यावेळी माजी सैनिक कदम सहकार संस्था सचिव अ. द. सावंत, पतपेढी कर्मचारी विद्या चिंदरकर, ग्रामसेवक प्रकाश सरमळकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंताना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी तळवडेकर हिने केले. यावेळी किशोर शिरोडकर, श्याम पावसकर, दीपक भोगटे, बापू तळावडेकर, सुभाष म्हाडगुत, समीर चांदरकर, काळे, प्रसाद परुळेकर, गावकर, विशाल वाईरकर, डॉ. गोपाळ सावंत, चित्रा साटविलकर, सौ नाईक, सौ. झाट्ये, मधुरा माडये, संजय पावसकर, जितेंद्र महाभोज, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
